'ती' म्हणजे माझी 'लाडकी १५६२'. प्रथमेश गो. गुरव.मळेवाड, सावंतवाडी.
एसटी प्रेमीच्या या प्रवासात अनेक चांगल्या वाईट गोष्टी अनुभवल्या. एसटीमुळेच माझ्यासारखेच एसटी वर जीवापाड प्रेम करणारे एसटी प्रेमी मित्र, प्रेमळ एसटी कर्मचारी ह्या सर्वांची साथ मला आयुष्यभरासाठी भेटली.
याच एसटी प्रेमी च्या प्रवासात मला 'ती' भेटली. 'ती' आली, 'तिने' पाहिलं, 'तिने' प्रवास घडविला अन तिने जिंकून घेतलं सारं.
'ती' म्हणजे माझी 'लाडकी १५६२'.
खूपच लाडकी असणाऱ्या एम.एच.१४.बीटी.१५६२ सोबत सावंतवाडी ला महाविद्यालयीन शिक्षण घेताना अनेक वेळा प्रवास केला. पण, काही कारणास्तव सावंतवाडी आगाराचा निरोप घेऊन विजयदुर्ग आगारात सेवा बजावण्यासाठी निघून गेली. विजयदुर्ग आगारात हस्तांतरित झाल्यावर माझ्या 'लाडकी' ची भेट काही केल्या होत नव्हती. १५६२ हस्तांतरित होऊन ४ वर्षे झाली होती तरी गाडीतून प्रवास करायचा योग तर दूरच या ४ वर्षात फार तर फार १-२ वेळाच गाडी प्रत्यक्षात पहिली असेन.
१५६२ ला भेटायची, तिच्यासोबत प्रवास करायची खूप इच्छा होती. माझ्या अनुभवानुसार ४ वर्षे म्हणजे थोडे-थोडके तर नक्कीच नाही.
अखेर, १५६२ ची भेट घ्यायची, तिच्यासोबत प्रवास करायचा, ४ वर्षापासून तिला भेटायची लागून राहिलेली आस पूर्ण करण्याचा ठाम निश्चय केला. तिच्यासाठी एक सरप्राईज देखील ठरवले, तसं मी तिला सरप्राईज काय देणार म्हणा कारण स्वतः १५६२ म्हणजेच माझ्यासाठी एक मोठं सरप्राईज होती.
१८ एप्रिल ला १५६२ ला भेटायचे ठरवले.
एसटी प्रेमी मित्रांकडून गाडीच्या नियताविषयी माहिती मिळवली. मिळालेल्या माहितीप्रमाणे १५६२ ला भेटायचं ठरवल्याच्या आदल्या दिवशी म्हणजे १७ एप्रिल ला गाडी विजयदुर्ग-पाचल या नियतावर वस्ती ला जाणार असे समजले. म्हणजे १८ तारीख ला गाडी पाचल वरून सकाळी निघून दुपारपर्यंत विजयदुर्ग ला पोहोचणार होती. त्यात, येताना गाडी आधी कणकवली ला येऊन मग विजयदुर्ग ला जाते हे समजल्यावर १५६२ सोबत कणकवली ते विजयदुर्ग प्रवास करायला मिळेल या विचाराने मी पुरताच खुश झालो होतो, पण या आनंदावर काही वेळासाठी काळे ढग जमा झाले कारण, पाचल-विजयदुर्ग ची विजयदुर्ग ला पोचण्याची वेळ ही दुपारी २:०० ची होती.
१५६२ माझी परीक्षा घेतेय की काय अस आता वाटू लागलं होतं...
गाडीचा दुपारी २:०० वाजता विजयदुर्ग ला पोचण्याचा मला प्रॉब्लेम असा होता की, २:०० वाजता पोचल्यावर मला पुन्हा माघारी सावंतवाडी ला येण्यासाठी गाडी नव्हती. त्यात फक्त दुपारी ३:०० वाजता सुटणारी विजयदुर्ग-मुंबई ही गाडी मला तळेरे पर्यंत भेटणार होती पण इथे देखील गाडी तळेरे ला पोचण्याची वेळ संध्याकाळी ५:०० वाजता ची होती, आणि नेमक्या त्या वेळेच्या आधी मुंबई-मालवण जिने कणकवली तर देवरुख-सावंतवाडी जिने मी थेट सावंतवाडी गाठू शकतो या दोन्ही गाड्या निघून जातात. या सर्व गाड्यांच्या वेळेचा खेळ हा काहीही करून रात्री ८:०० च्या आधी सावंतवाडी ला संपवायचा होता. कारण, सावंतवाडी पासून २० किमी अंतरावर असलेल्या माझ्या घरी जाण्यासाठी सावंतवाडी वरून ८:०० वाजता ची शेवटची बस होती. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत मला रात्री ८:०० वा. च्या आधी सावंतवाडी ला पोहोचणे गरजेचे होते आणि संध्याकाळी ५:०० वाजता तळेरे ला पोचणाऱ्या विजयदुर्ग-मुंबई गाडीने मुंबई-मालवण आणि देवरुख-सावंतवाडी या शेवटचा पर्याय असलेल्या गाड्या मला मिळणाऱ्या नव्हत्या त्यामुळे ८:०० च्या आधी सावंतवाडी ला पोचण्याची शक्यता खूपच कमी होती.
वेळेचे हे कोडं मला काही सुटता सुटत नव्हतं. या निमित्ताने वेळेचे महत्व मला जाणवले. वेळ कधीच कुणासाठी थांबत नाही हे तेव्हा पुरेपूर समजून चुकले.
या सगळ्या बिनसलेल्या वेळेच्या खेळामुळे थोडा निराश झालो होतो. सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे या प्रवासात मिळालेल्या एसटी प्रेमी मित्रांची मदत घ्यायचे ठरवले. वेळेचा सर्व खेळ त्यांना नीट समजावून सांगितला. त्यावर त्यांनी गाडी विजयदुर्ग ला जाण्याआधी जेव्हा कणकवली ला येईल त्यावेळी गाडीला भेट आणि सरप्राईज देखील दे अस सुचवलं.
माझ्या समोर मांडलेल्या वेळेच्या खेळावर मात करायची असेल तर त्यासाठी ही चांगली कल्पना होती.
पण ४ वर्षांपासूनची लाडकी सोबत प्रवास करायची इच्छा, तिला भेटण्यासाठी लागून राहिलेली आस, मला ही कल्पना काही मान्य करू देत नव्हती.
काय करावे? या विचारात असताना, जे होईल ते होईल पण, १५६२ ची १८ तारीख ला भेट घेऊन तिच्यासोबत एकत्र प्रवास करायचा म्हणजे करायचाच हे पक्क ठरवलं.
ठरवल्याप्रमाणे १८ तारीख ला सकाळीच १५६२ च्या भेटीसाठी माझ्या घरून ६:४० च्या बस ने निघालो. ७:२५ ला सावंतवाडी ला पोचल्यावर ७:३० ची सावंतवाडी-रत्नागिरी माझी वाट पाहत उभी होतीच. तिच्याचसोबतच थेट कणकवली गाठले, जिथे माझी ४ वर्षांची प्रतीक्षा पूर्ण होणार होती.
कणकवली ला पोचल्यावर एसटी प्रेमी मित्र सिद्धेश ची भेट झाली. पाचल-विजयदुर्ग गाडीची कणकवली स्थानकात येण्याची वेळ ही ११:०० ची होती. तोपर्यंत सिद्धेश सोबत स्थानकात फेरफटका मारत गाड्यांचे फोटो काढणे, एसटी विषयी गप्पांचा कार्यक्रम चालू होता.
आणि अखेर ठरल्या वेळेत जिच्यासाठी ४ वर्षे वाट पाहिली, जिच्या भेटीची आस लागून राहिली होती, जिच्यासाठी सारा खटाटोप चालू होता ती माझी 'लाडकी १५६२' माझ्या समोर येऊन उभी राहिली होती.
१५६२ च्या वाटेकडे लागून राहिलेले डोळे देखील तिला पाहून तृप्त झाले. मला जेवढी तिच्या भेटीची ओढ लागली होती अगदी तशीच की काय, तिला देखील मला समोर पाहून खूप आनंद झाला अशा ऐटीत ती माझ्यासमोर उभी होती.
त्यावेळचा १५६२ ला भेटल्याचा आनंद म्हणजे शब्द-वर्णन पलीकडेच...
कणकवली स्थानकातच १५६२ चे फोटो आणि सिद्धेश सोबत १५६२ समवेत एक सेल्फी काढला आणि माझ्या आवडत्या सीट (वाहक बाजूने शेवटून दुसरी) वर जाऊन बसलो.
११:१५ मिनिटांनी गाडीला स्टार्टर बसला आणि तो आवाज... काय माहीत पण तो आवाज ऐकल्यावर एक वेगळीच नशा वाटली जणू हा आवाज ऐकण्यासाठी माझे कान आतुर झाले होते.
अचानक ४ वर्षांपूर्वीचे १५६२ सोबतचे क्षण डोळ्यासमोर आले.
गाडी मार्गस्थ झाली. गाडीचा कोपरा न कोपरा मी वेड्यासारखा न्याहाळत होतो. कणकवली च्या बाजारातून बाहेर पडल्यावर चालक काकांनी गाडीला १५६२ समवेत सामावून घेतल्यावर माझा प्रवास तुफानी होणार आहे हे मी तेव्हाच समजून गेलो.
१५६२ सोबत जास्तीत जास्त वेळ राहता यावे म्हणून की काय गाडी कणकवली वरून थेट विजयदुर्ग न जाता तळेरे, मणचे, मुटाट, पडेल कॅन्टीन वरून फिरत जाणार होती. मी देखील पहिल्यांदाच या मार्गावर प्रवास करणार असल्याने नवीन मार्ग, त्या मार्गावरील गाव पहायला उत्सुक होतो.
काही वेळानंतर वाहक काका तिकीट देण्यासाठी आले. मला तिकीट विचारल्यावर मी एक विजयदुर्ग द्या सांगितले त्यावर त्यांनी मला आमच्या मालवणी भाषेत, 'अरे, ह्या गाडीतसून कशाक इलस? ही फिरान जातली हा' अस सांगितलं.
त्यावर मी पण काकांना एक स्मितहास्य देत 'अहो, माका माहीत आसा, द्या तुम्ही तिकीट' म्हटल्यावर त्यांनी आपल्या मशीन वर तिकीट काढून देताना ' कोण येवचा आसा काय रे ह्या गाडीत? अस विचारल्यावर मला हसू आवरेना.
त्यांच्या या प्रश्नावर, 'नाय ओ, तसा काय नाय' म्हणत मी नेमकं कशासाठी हा प्रवास करतोय हे सविस्तर सांगितल, हे ऐकून घेतल्यावर मग ते आपल्या जागेवर जाऊन बसले
काही वेळातच गाडी तळेरे स्थानकात पोहोचली. तळेरे स्थानकात घरी जाणाऱ्या शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी १५६२ खचाखच भरली होती.
दुर्गम, खेड्या-पाड्यातून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यात एसटीचा किती मोलाचा वाटा आहे हे यावरून लक्षात येते.
तळेरे स्थानकातून गाडी मार्गस्थ झाली. थोडे अंतर पूढे गेल्यावर गाडीने मुख्य हायवे सोडला आणि गावात जाणाऱ्या रस्त्याकडे वळली. आणि तिथून सुरू झाला १५६२ चा खरा प्रवास. इथे, फक्त १५६२ म्हणण्यापेक्षा आपली एसटी आणि एसटी कर्मचाऱ्यांचा खरा प्रवास म्हणणे योग्य ठरेल.
दरमजल करत एक बेल मारल्यावर प्रवाश्यांना उतरवत तर डबल बेल मारल्यावर जाऊदेत अशी वाहकाची सूचना ऐकल्यावर पुन्हा पुढच्या प्रवासाला १५६२ निघत होती.
गाडीतील विद्यार्थ्यांची मजा, मित्र-मैत्रिणीं सोबत चाललेली एकमेकांची थट्टा मस्करी हे सगळं अनुभवत १५६२ पुढे जात होती. बऱ्याच वेळा होणाऱ्या या गोंगाटामुळे चालकांचा लक्ष समोर केंद्रीत होत नाही अस मी बऱ्याच चालकांकडून ऐकलय पण, एसटीच्या चालकांसाठी तर हा गोंगाट म्हणजे नित्यनियमच. पण या गोंगाटामध्ये देखील लक्ष विचलित होऊ न देता सुखरूप प्रवास देणाऱ्या आपल्या एसटी चालकांचे कसब आणि त्या गोंगाटात राहून न चुकता सर्वांना तिकीट देणारे आपले वाहक यांचे कौशल्य वाखडण्याजोगे आहे.
गाडीतून खाली उतरलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या पुढच्या गावी जाणाऱ्या मित्र-मैत्रिणींना हातवारे करून निरोप देताना अप्रत्यक्षरित्या तेच हात आपल्या एसटीकडे देखील हातवारे करून निरोप देत असतात हे पाहून जणू ते आपलाच निरोप घेतायत अस समजून घेतल्यावर एसटीला तिने केलेल्या कार्याची पोच पावती मिळत असेल आणि आपल्या कुशीतून प्रवाशांना त्यांच्या इच्छितस्थळी पोचवताना एसटीला मनोमन समाधान वाटत असेल हे मला त्यावेळी जाणवले.
महिन्याअखेरीस एसटी कर्मचाऱ्यांना पैशाच्या स्वरूपात मिळणाऱ्या कामाच्या मोबदल्याच्या आनंदापेक्षा, प्रवाश्यांची सेवा करून त्यांना सुखरूप इच्छित स्थळी पोहचविल्याचा आनंद एसटी कर्मचाऱ्यांसाठी खूप मोलाचा आहे.
जस-जसा रस्ता निमुळता होत होता त्यावरून समजत होत की गाडी आता गावात शिरतेय. डांबरी रस्ता तर फक्त नावालाच राहिला होता. समोरून जर अजून एखादी चारचाकी गाडी आली तर साईड देण्यासाठी कोणत्या गाडीला किती मागे यावे लागेल हे देखील सांगता येणे कठीण होत. अक्षरशः कंबरडे मोडून टाकेल अशी त्या गावातल्या रस्त्याची परिस्थिती होती.
आता पर्यंत मी केलेल्या एसटी सोबतच्या प्रवासात पहिल्यांदाच एवढ्या खराब रस्त्यावरून एसटीने प्रवास केला होता.
१५६२ सोबत प्रवास करतोय म्हणून चेहऱ्यावर असलेला आनंद, उत्साह कधीच त्या रस्त्यावरून उडणाऱ्या धुरळ्यात नाहीसा झाला होता.
आता मनात फक्त चालू होते ते विचार...
•एवढ्या बिकट रस्त्यावरून एसटी कोणत्याही तक्रारीशिवाय सेवा देते मग याची जाण प्रवाश्यांना का नाही?
•जर या आणि अशा प्रकारच्या खेडे-गावातील रस्त्यावरून एसटीची सेवा बंद झाली तर शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रवासाचे दुसरे साधन काय?
•चाळण झालेल्या रस्त्यावरून एसटी सेवा देऊन देऊन एसटीची दयनिय अवस्था होते आणि मग एसटीच्या खिडक्या वाजतात, पत्रे हलतात आणि या गोष्टीला आपले प्रशासन जबाबदार असून देखील आपण एसटीलाच का नाव ठेवतो? का तिला दोष देतो?
•एसटीच्या खिळखिळ्या अवस्थेकडे बोट दाखवताना मोठी भगदाडे पडलेल्या रस्त्याकडे ज्यामुळे एसटीची खिळखिळी हालत होते त्याकडे लोक बोट का दाखवत नाहीत?
•एरवी एसटी कर्मचाऱ्यांना अरेरावी आणि मारहाण करण्यासाठी सरसावणारे हात याच खिळखिळ्या रस्त्यावरून कोणतीही तक्रार न करता अविरतपणे सुखरूप सेवा देतात तेव्हा त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी हे हात का पुढे सरसावत नाहीत?
•'जरा चांगल्या गाड्या पाठवा रे', अस सांगायला उघडणारे तोंड, 'रस्ता चांगला करा' , अस तुमच्या नेत्यांना सांगायला का उघडत नाही?
अशा एक ना अनेक विचारांचा कल्लोळ मनात चालू असताना मी वाहक काकांना मला डेपो कडील स्टॉप वर उतरवा हे सांगायचं विसरूनच गेलो आणि थेट विजयदुर्ग बसस्थानकात पोहोचलो. एव्हाना मनातील विचार शांत झाले होते. स्टँड वरून पुन्हा १५६२ सोबतच डेपो मध्ये आलो.
चालक काकांनी गाडी थेट डिझेल भरायला लावली. प्रवास करायची इच्छा तर इथे पूर्ण झाली होती आणि आता वेळ होती ती १५६२ साठी आणलेल्या छोट्याशा सरप्राईज ची.
डेपो मधील काही कर्मचाऱ्यांची भेट घेऊन लगेच १५६२ साठी आणलेले सरप्राईज तिला देण्यासाठी तयार झालो.
जिच्या साठी जीवाचा आटापिटा चालू होता ती १५६२ माझी अत्यंत लाडकी होती म्हणूनच १५६२ ला 'लाडकी' हे नाव द्यायचं ठरवलं होत. डिझेल भरून आल्यावर लगेच तेथील कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने गाडीला सावंतवाडी वरून येतानाच तयार करून आणलेले 'लाडकी' हे माझ्या १५६२ ला नाव दिले.
४ वर्षांपासूनची इच्छा, स्वप्न आज पूर्ण झाले होते. १५६२ ला लाडकी हे नाव दिल्यावर तर तिच्या सौंदर्यात अजूनच भर पडल्यासारखी वाटत होती.
या इच्छापूर्ती प्रवासासोबतच माझ्या लाडकी ने संपूर्ण एसटी आणि एसटीच्या कार्याचे महत्व मला पटवून दिले होते. महाराष्ट्रातील जनतेसाठी एसटीचे किती आणि काय महत्व आहे हे या संपूर्ण प्रवासात मला अगदी जवळून जाणून घेता आले.
या संपूर्ण प्रवासाच्या अनुभवावरून शेवटी मला एक गोष्ट मात्र नक्की आपल्या सर्वांना सांगावीशी वाटते ती म्हणजे, 'एसटी टिकली पाहिजे, जगली पाहिजे' यासाठी आपण प्रवाश्यांनी देखील प्रयत्नशील राहिले पाहिजे फक्त आणि फक्त तरच हे साध्य होईल, आणि आपल्या सेवेसाठी आपली 'लाडकी एसटी' सदैव तत्पर राहील...!
.
.
✍️ प्रथमेश गो. गुरव.
7768904744
मळेवाड, सावंतवाडी.

Comments
Post a Comment