Posts

एक छोटासा प्रवास पण सदैव आठवणीत राहणारा......

एक छोटासा प्रवास पण सदैव आठवणीत राहणारा...... २०१९ च्या अ‌ॉगस्ट महिन्यात मी मामाचा गणपती कारखाना पाहण्यासाठी घणसोली येथे गेलो होतो. तसा दरवर्षी जातो आणि दरवर्षी मार्गक्रम ठरलेला असतो. पेणहून पनवेल एसटीने आणि पनवेलहून पनवेल-ठाणे लोकलने घणसोली, येतानाही क्रम ठरलेला. तसा याही वेळी घणसोलीला गेली, कारखाना पाहून सायंकाळी घरी येण्यास निघालो.                   घणसोली बसथांब्यावर थोडे शहर बसेसचे फोटो काढले. सायंकाळचे ६.०० वाजले होते. म्हटलं आता निघायला हवं, उशीर होईल. घणसोली रेल्वेस्थानकावर तिकीट काढून प्लॅटफॉर्मवर आलो. नेहमीपेक्षा जरा जास्त गर्दी दिसत होती. विचार केला काहीतरी असेल आज म्हणून असेल गर्दी. नेहमी प्लॅटफाॅर्मवर उभा राहील्यावर जास्तीत जास्त १० ते १५ मिनीटात येणारी लोकल आज २०-२५ मिनीटे झाली तरी कोणत्याही बाजूने येताना दिसत नव्हती. थोडीशी चिंता होऊ लागली. असाच अर्धा तास झाला, १ तास झाला तरी लोकल आली नाही. आणि अचानक अनाउन्समेंट झाली की "पुढील सुचना येईपर्यंत लोकल सेवा बंद राहील "             ...

एसटीचे फोटो काढण्यामागे असणारी मेहनत

नमस्कार मंडळी. आज एका महत्त्वाच्या विषयावर लिहीत आहे. याविषयावर लिहायचे बऱ्याच दिवसांपासून मनात होते कारण एसटी प्रेमी आणि त्यांचा छंद ह्याबद्दल अतिशय महत्वाची गोष्ट आहे. अगदी खूप आधीपासून एसटी प्रेमी ग्रुप मध्ये एकमेकांचे फोटो व्हिडिओ चोरणे, इकडचे फोटो तिकडे पोस्ट करणे, स्वतःचे नाव टाकून दुसऱ्याचे फोटो वापरणे असे अनेक प्रकार अगदी सर्रास पणे सुरू आहेत. आम्ही admin मंडळी असं करू नका, असे बोंबलत असतो मात्र तरीही हे प्रकार काही थांबत नाहीत.  आता तर ह्यात अनेक नवीन नवीन पळवाटा शोधून दुसऱ्याचे फोटो स्वतःच्या प्रसिद्धीसाठी वापरणे सुरू झालेले आहे. तर ह्याच विषयावर मत व्यक्त करण्यासाठी आणि असे दुसऱ्याचे फोटो का वापरू नयेत ह्या मागची भूमिका सांगण्यासाठी हा लेखप्रपंच. सर्वप्रथम आपण स्वतः एसटीचे काढून ते पोस्ट करण्यात किती मेहनत असते ते पाहूया एसटीचे फोटो काढणे. आपल्यापैकी प्रत्येकाने कधी ना कधी एसटीचे फोटो काढले आहेत. त्यामुळे त्यामागे असणारी मेहनत आपल्याला चांगलीच माहिती आहे.  बसस्थानकावर फोटो काढण्यासाठी तर विशेष मेहनत घ्यावी लागते. तेथील गाड्यांची व प्रवाशांची गर्दी, चालक वाहक...

एसटीमधील देवदूतांना सलाम -संकेत मोरे

महाड दुर्घटनेतील देवदुतांपैकी एक, गुहागर - बोरीवलीचे चालक व वाहक... दिनांक २ ऑगस्ट २०१६. रात्री ११:१५ - ११:३० ची वेळ. महाराष्ट्रात तुफान पाऊस चालू होता. त्यातच कोकणात देखील मुसळधार पाऊस कोसळत होता. महाबळेश्वर आणि महाड परिसरातील संततधार पावसामुळे महाड जवळील सावित्री नदी आणि काळ नदीला भयंकर पूर आला आणि त्यांनी रुद्रावतार धारण केला. त्यातच ह्या दोन नद्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महाड येथे एकमेकांना मिळत असल्याने दोन्ही नद्यांच्या पाण्यामुळे त्यांचा आधीच झालेला रुद्रावतार आता आणखी प्रलयंकारी झाला. त्यातच ह्या पुराच्या पाण्याने मुंबई - गोवा महामार्गावरील महाड शहरानंतर असणारा राजेवाडी येथील १०० वर्षे जुना ब्रिटीश कालीन पूल पावसाच्या पाण्याच्या तडाख्याने काही समजायच्या आतच ढासळला आणि नावाप्रमाणेच सर्वांसाठी काळ बनून आला. राष्ट्रीय महामार्ग असल्याने वाहतुकीची वर्दळ तर होतीच, पण मुसळधार पाऊस आणि किर्र अंधार ह्यांमुळे समोरचे दिसणे देखील कठीण होऊन गेले होते. पूल कोसळल्याने कित्येक वाहनांना काही कळायच्या आत ह्या सावित्रीने आपल्या उदरी गिळंकृत केले होते आणि त्यातच महाराष्ट्र राज्य म...

होय, मी आहे ती १५३२ !!! - संकेत मोरे

Image
आपला एवढा मोठा हा महाराष्ट्र! अगदी चांद्यापासून ते बांद्यापर्यंत उभा आडवा पसरलेला विस्तृत भूभाग. कुठे अवघड वळणांचे घाट, कुठे सागरी किनारे, कुठे अगदी दुर्गम गावे, तर मुंबई पुण्यासारखी मोठी शहरे!!! सर्वत्र मी व माझ्या बहिणी अव्याहतपणे सेवा देत आहोत. एवढ्या मोठ्या राज्यात आणि आजूबाजूच्या राज्यांतदेखील आम्ही अखंडपणे धावत आहोत. आज वाहतुकीच्या इतक्या सुविधा असताना देखील सर्व सामान्यांचा आमच्यावर एवढा विश्वास आहे हे पाहून खरंच अगदी मन भरून येते. आम्ही आमच्या कर्तव्यात कधीच कसूर करत नाही, आणि कधी करणारही नाही. कारण आमचे ब्रीदच आहे, ' प्रवाशांच्या सेवेसाठी '. जनसेवा हीच ईश्वरसेवा मानून आम्ही न थकता, कोणत्याही वातावरणात, कोणत्याही प्रकारच्या रस्त्यांवर न डगमगता, न डळमळता चालत असतो. तुम्हा सर्व प्रवाशांचे आशीर्वादच हो, दुसरं काय!!! जसा कृष्ण अर्जुनाच्या रथाचा सारथी झाला, तसेच एस. टी. चे चालक व वाहक हे आमचे सारथी होऊन आपले कर्तव्य बजावत असतात. मेकॅनिक्स, चालक व वाहक हि दत्तरूपी त्रयी म्हणजे आम्हा एस. टी. बसेसचा मुख्य आधारस्तंभ. जसा घरातील करता पुरुष किंवा स्त्री आपल्या संपूर्ण कुटुंबास...

माझा_बळी_का? (एसटी रडतेय...) - प्रथमेश गो. गुरव. (एसटी प्रेमी) सावंतवाडी.

# माझा_बळी_का ? (एसटी रडतेय...) आई गss.. ए आई, नको ना मारू, दुखतंय.. ही वाक्य आपल्या सर्वांच्या कानावरून गेली आहेत. गेली आहेत म्हणण्यापेक्षा आपल्या सर्वांच्या तोंडी ही वाक्ये लहान असताना आली आहेत. आठवल का काही? लहान असताना आपण एखादी चूक केली की आई किंवा वडील आपल्याला मारताना आपल्या तोंडून ही वाक्ये निघायची. व्हायच्या ना वेदना मार मिळाल्यावर?? हे उदाहरण देण्याचा उद्देश हाच की, आपण जेव्हा एसटीवर दगडफेक करतो तेव्हा आपली एसटी सुद्धा असच ओरडतेय, तिला होणाऱ्या वेदनांनी ती विव्हळतेय. हो, आपली एसटी रडतेय... एसटी म्हणजे सर्वसामान्य प्रवाश्यांची हक्काची जीवनवाहिनी, हक्काचे प्रवासाचे साधन. पण आज आपण या हक्काचा जरा जास्तच दुरुपयोग करतोय किंवा जास्तच हक्क गाजवतोय अस मला वाटू लागलंय. हो, याच मुख्य कारण म्हणजे, एखाद्या संपात, आंदोलनात अगदी सर्रास पणे टार्गेट केली जाते ती आपली एसटी. आंदोलन किंवा संप कोणत्याही कारणासाठी असुदेत त्या गोष्टीशी एसटीचा काडीमात्र सबंध नसताना तिच्यावर दगडफेक केली जाते, काही ठिकाणी तर पूर्ण गाडीच पेटवली जाते. का? एसटीच का? तिचा या सगळ्यांशी काय संबंध? एसटीवर दगडफेक...

मित्राच्या रुपात विठ्ठल भेटला. - गणेश लवाटे

मित्राच्या रुपात  # विठ्ठल  भेटला, दि, १४ जुलै २०१८ रोजी मी व माझे वडील पंढरपूर जाण्यासाठी सकाळी ७ च्या करमाळा आगारा च्या एम एच १४ बीटी २७८५ या MS BODY असलेल्या  # नाशिक  -  # पंढरपूर  बसने प्रवास सुरु केला, सदर बस अहमदनगर च्या पुढे एका हॉटेल ला जेवणासाठी थांबली, नेमके त्याच वेळेस बसचे मागील टायर पंक्चर असल्याचे आढळून आले, चालकाने समोरच असलेल्या टायरच्या दुकानात पंक्चर काढले, पण त्या पंक्चरवाल्या आण्णा ने मशीनच्या सहाय्याने नटबोल्ट फिट केले व आमचा पुढील प्रवास चालू झाला, आम्ही दुपारच्या सुमारास crew change साठी करमाळा आगारात पोहोचलो, तेथे डिझेल भरण्यात वेळ गेला आधीच गाडी लेट झालेली, त्या दरम्यान आम्ही चहा घेतला, पुढच्या crew ने बस ताब्यात घेतली आणि पुन्हा प्रवास सुरु झाला, पुढे गेल्यावर मी माझे मित्र व आपल्या ग्रुपचे सदस्य  Mahesh Jadhav , जे इंदापूर आगारात वाहक आहेत त्यांना सहज फोन केला व गप्पा मारताना ते महटले की आपण टेंभुर्णी ला भेटू, मी त्यांना बोललो की गाडी लेट आहे थांबता येणार नाही पण महेश भाऊंनी ऐकलंच नाही, ते माझ्या अगोदर इंदापुरहून टें...

सीमेवरील जवानाला मिळवून दिली एसटीमध्ये जागा - श्रीकांत चांगण

नेहमी प्रमाणे मी बोरीवली नॅन्सी कॉलनी मध्ये एसटी चे फोटो काढत होतो. तसा मी दर शनिवारी आणि रविवारी बोरीवली नॅन्सी कॉलनी मध्ये फोटो क्लिक करायला जातोच. एसटी चे फोटो काढत असताना अर्नाळा-कोल्हापूर हि शिवशाही बस आली.ड्राइवर आणि कंडक्टर काका खाली उतरल्यावर मी त्या गाडीचे मस्त फोटो काढले..तेव्हा तिथे एक प्रवासी आला आणि मला विचारू लागला कि हि गाडी सातारा ला जाते का..मी म्हणलो जाते कि. मग त्याने कंडक्टर काका ना विचारल गाडीत जागा आहे का तर काका म्हणाले एक हि जागा नाही ..आणि खरचं गाडी अर्नाळा वरूनच फुल्ल भरून आलेलि .. मी हे सगळं ऐकतच होतो.. मग मी त्याला म्हणलो कि मागून अर्नाळा कोल्हापूर साधी गाडी येत आहे तिने जा ..मग तो मला सांगू लागला कि अरे मी जम्मू वरून आलोय..चार दिवस नीट झोपलो हि नाही..मला अंदाज आलाच आणि मी म्हणालो बॉर्डर वर असता का..तो म्हणालो हो.. आणि खरंच त्याचा डोळ्या वरून मला जाणवलं कि ह्याची झोप झालेली नाही..तो म्हणत होता कसही करून मला आज पाचवड (सातारा येथील एक ठिकाण ) ला जायचं आहे..हि गाडी मिळाली तर 11 वाजे पर्यंत पोचेन आणि मला झोपता येईल नीट माझा घरी .. तो मला विनंती करू...