एसटीचे फोटो काढण्यामागे असणारी मेहनत
नमस्कार मंडळी. आज एका महत्त्वाच्या विषयावर लिहीत आहे. याविषयावर लिहायचे बऱ्याच दिवसांपासून मनात होते कारण एसटी प्रेमी आणि त्यांचा छंद ह्याबद्दल अतिशय महत्वाची गोष्ट आहे. अगदी खूप आधीपासून एसटी प्रेमी ग्रुप मध्ये एकमेकांचे फोटो व्हिडिओ चोरणे, इकडचे फोटो तिकडे पोस्ट करणे, स्वतःचे नाव टाकून दुसऱ्याचे फोटो वापरणे असे अनेक प्रकार अगदी सर्रास पणे सुरू आहेत. आम्ही admin मंडळी असं करू नका, असे बोंबलत असतो मात्र तरीही हे प्रकार काही थांबत नाहीत. आता तर ह्यात अनेक नवीन नवीन पळवाटा शोधून दुसऱ्याचे फोटो स्वतःच्या प्रसिद्धीसाठी वापरणे सुरू झालेले आहे. तर ह्याच विषयावर मत व्यक्त करण्यासाठी आणि असे दुसऱ्याचे फोटो का वापरू नयेत ह्या मागची भूमिका सांगण्यासाठी हा लेखप्रपंच. सर्वप्रथम आपण स्वतः एसटीचे काढून ते पोस्ट करण्यात किती मेहनत असते ते पाहूया एसटीचे फोटो काढणे. आपल्यापैकी प्रत्येकाने कधी ना कधी एसटीचे फोटो काढले आहेत. त्यामुळे त्यामागे असणारी मेहनत आपल्याला चांगलीच माहिती आहे. बसस्थानकावर फोटो काढण्यासाठी तर विशेष मेहनत घ्यावी लागते. तेथील गाड्यांची व प्रवाशांची गर्दी, चालक वाहक...