मानाचा एसटी प्रेमी पुरस्कार
नमस्कार ,मंडळी
आपली एक तारखेची स्पर्धा आता नियमितपणे सुरु आहे. आपण सर्वांनी दिलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल आपले खूप खूप आभार. आपण सर्वांनी मिळून तब्बल सलग ३ वर्ष ही स्पर्धा यशस्वीपणे पार पाडली आहे. आतापर्यंत एकूण ३६ स्पर्धा आपल्या ग्रुपवर संपन्न झाल्या. ह्यापुढेही नवीन वर्षात आपण ही स्पर्धा अशाच प्रकारे सुरु ठेवणार आहोत. येत्या काही दिवसात २०२० हे नवीन वर्ष सुरु होत आहे. ह्याच मुहूर्तावर MSRTC LOVERS GROUPतर्फे सर्व एसटी प्रेमींसाठी एक नवीन स्पर्धा.
सर्वच एसटी प्रेमी आपापल्या परीने आपल्या MLG ग्रुपसाठी तसेच एसटीसाठी आपले योगदान देत असतात. स्वतःच्या सर्व शिक्षण, नोकरी, कौटुंबिक व इतर जबाबदाऱ्या सांभाळत वेळात वेळ काढून एसटी प्रेमी आपले एसटीवरील प्रेम विविध माध्यमातून व्यक्त करीत असतात. अशाच एसटी प्रेमींना "मानाचा एसटी प्रेमी" हा 'किताब देऊन गौरवण्यात येणार आहे. हा गौरव म्हणजे संपूर्ण MLG परिवाराकडून केलेला सत्कार असेल.
ह्या स्पर्धेविषयी -
सध्या ही स्पर्धा दर तीन महिन्याला असेल. जानेवारी, एप्रिल, जुलै, ऑक्टोबर असे वर्षातून ४ महिन्यात "मानाचा एसटी प्रेमी"असा गौरव करण्यात येईल.
ह्या महिन्यांच्या १५ तारखेच्या सुमारास ह्या पुरस्काराचा मानकरी जाहीर करण्यात येईल.
ह्यामध्ये ग्रुपवर त्यांच्या नावाचे प्रशस्तिपत्रक सर्व माध्यमातून जाहीर करण्यात येईल तसेच एक प्रशस्तिपत्रक त्यांच्या पत्त्यावर घरपोच पाठविण्यात येईल.
ह्या पुरस्काराचे मानकरी ग्रुपचे ऍडमिन व मॉडरेटर्स आपापसात चर्चा करून ठरवतील.
तसेच सदर एसटी प्रेमीची "मानाचा एसटी प्रेमी" ह्या पुरस्कारासाठी कोणत्या निकषांवर निवड करण्यात आली हे सुद्धा स्पष्ट करण्यात येईल.
"मानाचा एसटी प्रेमी" ह्या किताबाचा मानकरी होण्यासाठी पुढील गुण विचारात घेतले जातील.
सकारात्मक गुण -
ग्रुपवर सहभागी असणे,
ग्रुपच्या उपक्रमांमध्ये आपले योगदान देणे,
MSRTC LOVERS GROUP सोबत बांधिलकी जपणे.
ग्रुपच्या सूचना व नियमांचे पालन करणे.
एसटी प्रेम विविध माध्यमातून व्यक्त करणे. [बस सजावट व बोर्ड देणे ह्याचबरोबर ग्रुपवर इतर सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांवर योग्य माहिती पुरविणे, एसटीचे सुंदर फोटो काढणे, स्वहस्ते एसटीची चित्रे काढणे, प्रवासवर्णने, तिकिटांचा संग्रह, एसटी कर्मचाऱ्यांसोबत सहकार्य, बस नंबर्सच्या डाटाबेस जमा करण्यात योगदान देणे, वाटाड्याची साहित्य पाठविणे, एसटी प्रशासनाकडे लिखित स्वरूपातील नेमक्या सूचना, तक्रारी व पाठपुरावा करणे, तसेच अन्य कोणत्याही मार्गाने MLG ग्रुपसाठी तसेच एसटीसाठी आपले योगदान देणे अशा अनेक प्रकारे एसटीवरील प्रेम व्यक्त करता येऊ शकते]
नकारात्मक गुण -
MLG ग्रुपवरील निष्क्रियता.
ग्रुप सदस्यांमधील वैयक्तिक वादविवादांमध्ये सहभाग.
एसटी प्रेमींचा वेगळा ग्रुप तयार करून MLG सोडून त्याच ग्रुपवर सक्रिय राहणे.
ग्रुपमधील सदस्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास देणे.
MLG च्या बळावर स्वतःचा वैयक्तिक फायदा करून घेणे.

Comments
Post a Comment