एसटी बस फॅनिंग - एक मेडिटेशन
एसटी बस फॅनिंग - एक मेडिटेशन
नमस्कार. तर मंडळी आपण सर्व एसटी प्रेमी. आपण "एसटी प्रेमी" ही बिरुदावली उगाच मिरवत नाही. खरोखरचं एसटी आणि आपल्यामध्ये एक प्रेमाचं, विश्वासाचं, आपुलकीचं नातं निर्माण झालंय. मला पूर्ण खात्री आहे की आपल्यापैकी प्रत्येकालाच कधी ना कधी विविध स्वरूपात ह्याचा प्रत्यय आलेला असणारच. एसटीचा विषय कुठेही निघाला की आपण अगदी भावनाविवश होऊन एसटीच्या विश्वात रमून जातो. मी ह्यापूर्वी एसटीबाबतच्या माझ्या वैयक्तिक भावना वाटाड्याच्या पूर्वीच्या अंकांमध्ये " एसटी माझी प्रेरणादायी" आणि " होय एसटी सुद्धा आमच्यावर प्रेम करते" ह्या लेखांमधून व्यक्त केल्या आहेत. मात्र ह्यावेळी एसटी आणि माझं नातं ह्याचा विचार करताना असं जाणवलं की आपण जेव्हा बस फॅनिंग करतो तेव्हा एका वेगळ्याच दुनियेत असतो. काहीवेळ बस फॅनिंग केली की आपण स्वतःमध्ये एक आंतरिक समाधान, उत्साह, सकारात्मक ऊर्जा अनुभवतो. जणू काही ते एक प्रकारचं मेडिटेशन असतं आपल्यासाठी. म्हणूनच ह्या वाटाड्यामध्ये "एसटी बस फॅनिंग एक मेडिटेशन" हा लेख आपल्या समोर सादर करीत आहे.
सध्या आपण सर्वच जण आपापल्या दैनंदिन कामकाजात व्यस्त असतो. अनेक कारणांमुळे आपले जीवन सध्या बरेच धावपळीचे बनले आहे. ह्यामुळे ताणतणाव, टेन्शन, डिप्रेशन अशा प्रकारचे शब्द आपल्या रोजच्या संवादातील एक घटक बनले आहेत. अर्थात या सर्वांवर उपाय सुद्धा आपल्यासमोर हजर आहेत. मेडिटेशन - ध्यानधारणा हा त्यापैकीच एक उपाय होय. म्हणूनच आजकाल लोकांना मेडिटेशनचे फायदे समजू लागले आहेत. मेडिटेशन म्हणजे थोडक्यात आजूबाजूच्या कोलाहलापासून काहीसं अलिप्त होऊन स्वतःशी समरस होऊन जाणे. प्रत्येकाची मेडिटेशनची पद्धत, जागा, वेळ, साधने ही वेगवेगळी असतात.
आपल्यासारख्या एसटी प्रेमींसाठी बस फॅनिंग करणे हेच एक प्रकारचे मेडिटेशन असते. बस फॅनिंग करताना एक वेगळीच तंद्री लागलेली असते. अतिशय आल्हाददायक असा अनुभव असतो. बस फॅनिंग पार पडल्यावर आपण आपोआप रिफ्रेश होऊन जातो. अगदी रिचार्ज झाल्यासारखं वाटतं. बस फॅनिंग करताना पाहिलेल्या बसेस काढलेले फोटो ह्या गोष्टी आपल्यासाठी एक प्रकारचं टॉनिकच काम करतात.
माझं मेडिटेशन - बस फॅनिंग जेव्हा केव्हा कोणत्याही कारणाने दैनंदिन कामकाजामध्ये, जवळच्या नातेसंबंधांमध्ये काहीसा कडवटपणा येतो तेव्हा त्यातून बाहेर पडून पुन्हा आपली गाडी रुळावर येण्यासाठी बस फॅनिंग हा एक रामबाण उपाय आहे. मी पनवेल जवळील खांदा कॉलनी येथे राहतो. त्यामुळे माझी बस फॅनिंग करण्यासाठी सर्वात आवडती जागा म्हणजे पनवेल बसस्थानक. बस फॅनिंगसाठी जायचे म्हटल्यावर मी माझा मोबाईल तसेच कॅमेरा सोबत घेतो आणि घरातून बाहेर पडतो. आमच्या घरातून चालत ५ मिनिटांमध्ये खांदा गाव ह्या बस स्टॉप पर्यंत पोहोचता येते. तेथे पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या लोकल बसेसचा थांबा आहे. स्टॉपवर येताच हायवेवर पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या आणि पनवेल वरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या अनेक एसटी बसेस नजरेस पडतात. लांबूनच ह्या एसटी बसेस पाहिल्यावर ती बस कोणती असेल ह्याचे अंदाज बांधणे सुरु होते. तेथेच माझे एसटी आगार, वेळापत्रक इत्यादीबाबतचे विचारचक्र सुरु झालेले असते. स्टॉपवर पनवेलला जाण्यासाठी लोकल बसची वाट बघेपर्यंत हायवेवरून धावणाऱ्या बसेसचे फोटो मी माझ्या कॅमेऱ्यात काढतो. बस मिळाल्यावर कंडक्टरला नेमके सुटे ७ रुपये देऊन मिळणारे तिकीट अगदी जपून पाकिटात ठेवून माझा पनवेल बसस्थानकाच्या दिशेने सुमारे ६ ते ७ मिनिटांचा प्रवास सुरु होतो.
हायवेवर येऊन पनवेलला जायला एसटी पकडल्याने होणारा सर्वात मोठा फायदा म्हणजे एसटी मला थेट पनवेल बसस्थानकात नेऊन सोडते. पनवेल बसस्थानक जवळ आले की पनवेल आगाराच्या वर्कशॉपचा परिसर सर्वप्रथम नजरेस पडतो. नकळत माझी नजर तिकडे जाते. वर्कशॉप परिसरात एखाद्या आगाराची बस ब्रेकडाऊन होऊन उभी आहे का? हे मी सर्वप्रथम पाहतो. तसे आमचे पनवेल अगदी मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे बऱ्याचवेळा विविध आगाराच्या बसेस पनवेलला बंद पडल्यामुळे उभ्या असतात. त्या बसेस बघून झाल्या की काही सेकंदातच आमची एसटी पनवेल बसस्थानकात प्रवेश करते. मग बसमधून उतरल्यावर सर्वप्रथम ज्या लोकल बसने मी पनवेल बसस्थानकात पोहोचतो तिचा फोटो काढतो. हळूहळू बस फॅनिंगची सेशनची सुरुवात होत असते.
मग बसस्थानकात सर्वत्र एक नजर फिरवून कुठे काही विशेष बस दिसतेय का? ह्याचा शोध सुरु होतो. काही नवीन बस अथवा मॉडिफिकेशन केलेली ग्रील असणारी बस दिसली की लगेच पळत जाऊन तिचा फोटो काढतो. आता मुख्य फलाटावर लागलेल्या सर्व बसेसचे फोटो काढून घेतो. एखाद्या बसमध्ये शक्य असेल तर मग आतमध्ये चढून बोर्डाचा फोटो काढतो. तेवढ्यात एखादी क्वीन बस स्टॅन्डमध्ये आली की तिचा फोटो काढतो. त्यानंतर मग आमच्या पनवेल स्टॅण्डवर पाणावले आगाराच्या तसेच बाहेरील आगाराच्या पनवेल फेरीवर असणाऱ्या बसेस आराम करीत स्थानक परिसरात उभ्या असतात. त्यातील काही बसेस मोकळ्या जागेत अगदी खास पोझ देऊन उभ्या असतात. मग अशा बसेसचे विविध बाजूंनी वेगवेगळ्या अँगल मधून फोटोसेशन होते.
मग एक अशी जागा निवडली जाते की तेथे उभे राहून बसस्थानकात प्रवेश करणाऱ्या एस्ट्यांचे अगदी नेमके फोटो काढता येतील. मग त्याठिकाणी उभे राहून बरेच फोटो काढतो. पनवेल आगाराच्या आतमध्ये जर एखादी बंद पडलेली बस असेल तर पटकन मागच्या बाजूने आत जाऊन तिचा फोटो काढून येतो. अशाप्रकारे बरेच फोटो काढत असताना एक वेगळेच ध्यान लागते. आजूबाजूला असणाऱ्या एसटी बसेस, त्यांचे मार्ग पाहून मी एसटी फॅनिंगमध्ये पुरता गुंतून जातो. मग पुन्हा एकदा फलाटावर एक राउंड मारतो. कधी कधी काही प्रवासी बसबद्दल माहिती विचारतात. मग त्यांना नेमके मार्गदर्शन केल्यावर एक वेगळेच आंतरिक समाधान मिळते. ह्या सर्व ध्यानधारणेचा परमोच्च बिंदू तेव्हा गाठला जातो जेव्हा अचानक एखादी ऑफलिंक बस, नवीन ज्यादा बस मार्ग, एखादा जुना ट्रॅक नजरेस पडतो आणि मी जाऊन त्याचा फोटो काढतो.
एवढी बस फॅनिंग केल्यावर बरीच दमछाक होते. फोटो काढण्यासाठी इकडे तिकडे पळून चांगलाच व्यायाम झालेला असतो. त्यामुळे सडकून भूक लागलेली असते. मग नकळत पावले बसस्थानकासमोरच्या विसावा हॉटेलकडे वळतात. तेथील मिसळ, बटाटेवडा ह्यांच्यावर ताव मारणे हा सुद्धा एक मेडिटेशनचाच भाग आहे बरं का. भरपेट नाश्ता झाल्यावर मग पुन्हा लोकल बस पकडून मी आमच्या खांदा कॉलनीकडे जायला निघतो. घरी जात असताना अनेक अनुभवांची शिदोरी सोबत घेऊन मी जात असतो. घरी पोहोचल्यावर पुन्हा सर्व फोटो पाहणे त्यातील काही महत्वाचे आपल्या ग्रुपवर फोटो आपल्या ग्रुपवर शेअर करणे. इत्यादी बाबी झाल्यावर बस फॅनिंगचे सेशन पूर्ण झाल्यासारखे वाटते.
अशाप्रकारे बस फॅनिंगमुळे एक प्रकारचा बूस्टर डोस मिळून जातो आणि येणाऱ्या नित्यनेमाच्या कामकाजास सामोरे जाण्यासाठी तो व्यवस्थित ऊर्जा पुरवितो. तसेच गणपती ज्यादा, दिवाळी ज्यादा, यात्रा विशेष वाहतूक व्यवस्था म्हणजे जणू काही एसटी प्रेमींसाठी एक प्रकारचे विपश्यना शिबीरच असते. बस फॅनिंग नंतर मिळणाऱ्या समाधानाची सर दुसऱ्या कशालाही येऊ शकणार नाही. म्हणूनच म्हणतो -
एसटी फॅनिंगच एक सेशन हेच एसटी प्रेमींचं मेडिटेशन

Comments
Post a Comment