मानाचा एसटी प्रेमी" द्वितीय पुरस्कार १५एप्रिल २०२०

*MSRTC LOVERS GROUP तर्फे देण्यात येणारा "मानाचा एसटी प्रेमी" द्वितीय पुरस्कार १५एप्रिल २०२० रोजी   MLG चे सदस्य श्री. अमोल शिनगारे ह्यांना जाहीर होत आहे. सर्व MLG सदस्यांच्या साक्षीने त्यांनी ह्या पुरस्काराचा स्वीकार करावा ही विनंती.

   श्री. अमोल शिनगारे सर हे मूळचे मंगळवेढा जिल्हा सोलापूर येथील रहिवासी असून ते एक कर्तव्यदक्ष तसेच त्यांच्या  कर्तव्यावर निस्सीम प्रेम व श्रद्धा असणारे एसटी कर्मचारी आहेत.

अमोल सर मंगळवेढा आगारात कार्यरत असून यापूर्वी तासगांव आगारात सुद्धा काम करून तासगांव आगारात वेगळी ओळख निर्माण केली आहे. सद्य स्थितीत ते  मंगळवेढा आगारात सेवा बजावत आहेत.


नेहमी गाडी १००% फायद्यात चालावी व महामंडळाचा फायदा व्हावा अशी नेहमी मानसिकता ठेवतात व मनावर किती ही मानसिक ताण असला तरी प्रवासी हाच देव मानून नेहमी प्रवाशांसोबत आपुलकीने वागतात, त्यामुळे प्रवासी वर्गात देखील अमोलसरांनी एसटी कर्मचारी म्हणून एक वेगळी प्रतिमा निर्माण केली आहे, अमोल सर हे नक्कीच एक आदर्श एसटी कर्मचारी आहेत.

एसटी कर्मचारी म्हणून कर्तव्य बजावताना त्यांनी ग्रुपच्या भवितव्यासाठी देखील मोलाचा हातभार दिला आहे.


नेहमी अप टू डेट असणारे अमोल सर हे ग्रुप वर देखील नेहमी अप टू डेट असतात, एसटी प्रेमींकडे एक विशेष ओढ असल्याने नेहमी ते आपल्या ग्रुपतर्फे होणाऱ्या विविध कार्यक्रमांना उपस्थिती दर्शवत असतात. तसेच कर्तव्य बजावत असताना सभासदांच्या धावत्या भेटी गाठी देखील खूप आनंदाने घेत असतात. त्यांचा हसतमुख चेहरा बघून इतर लोक सुद्धा उत्साहित होतात.


ग्रुप वर होणाऱ्या विविध चर्चांमध्ये नेहमीच अमोल सर सहभागी होऊन त्यांच्याकडे असलेल्या माहितीचा व अनुभवांचा वापर करून नेहमी सर्व सभासदांना उत्तमरित्या मार्गदर्शन करतात.

आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या MLG सोबत ते कायम एकनिष्ठ आहेत. म्हणूनच MLG च्या ऍडमिन टीमने हा द्वितीय पुरस्कार त्यांना बहाल करण्याचा निर्णय घेतला आहे.

Comments

Popular posts from this blog

एसटीला बोर्ड देणे - मार्गदर्शक सूचना

विदर्भाची बात काही औरच - श्रीकांत चांगण

माझा_बळी_का? (एसटी रडतेय...) - प्रथमेश गो. गुरव. (एसटी प्रेमी) सावंतवाडी.