एसटी ठरली देवदूत
एसटी प्रेमींचे एसटी सोबतचे नाते खूप वेगळेच असते.
अनेक विविध अनुभवांनी एसटी प्रेमींचे भावविश्व भरलेले असते.
असाच एक माझा कालच आलेला अनुभव
मी आणि माझी आई संध्याकाळी पनवेल वरून निघून वाघजाई देवीमंदिर खंडाळा येथे आमच्या अलिबाग वरून आलेल्या आळंदी दिंडी सोबत जेवणाच्या कार्यक्रमासाठी गेलो होतो. जाताना आम्ही पनवेल खोपोली Mh 14 BT 1592 आणि तिथून खोपोली नगरपरिषदेच्या बस ने खंडाळा येथे गेलो. आम्हाला जेवण झाल्यावर तिथून निघायचे होते. माझ्या डोक्यात रात्री तिथून रिक्षाने लोणावळा बस स्थानकावर जाऊन बस पकडायची असा प्लान होता. मात्र एवढ्या रात्री रिक्षा मिळेल कि नाही हि जरा शंकाच होती.त्यामुळे माझ्या मनात सारखी लोणावळा स्थानक कसे गाठायचे याची चिंता होती. त्यात नेमके आम्ही ते मंदिर शोधत शोधत पोहचलो तेव्हा समजले कि ते मंदिर लोणावळा वरून जो मुंबई दिशेला जाणारा रस्ता आहे त्या रस्त्याला लागून आहे आणि तिथून लोणावळ आणि खंडाला सुमारे ५ किमी वर आहे त्यामुळे रिक्षा बाबत शक्यता फारच धूसर होती.
रात्री ९.३० वाजता जेवण वगैरे झाल्यावर आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. आमच्या सोबत काही वारकरी मंडळी आम्हाला बस मध्ये बसवून दयायला आली. आम्ही लोणावळा वरून मुंबई कडे जाणारी एसटी थांबवायची किवा एखादी रिक्षा मिळाली तर लोणावळा स्थानकावर जायचे असे ठरवले
रात्री ९.३५ वाजता आम्ही सर्व जण त्या भयाण अंधारामध्ये उभे होतो. सगळीकडे किर्र शांतता होती. किड्यांचा आवाज जोरात घुमत होता. थंडगार वारा घोंघावत होता. एका बाजूला लोणावळाचा झगमगाट आणि दुसऱ्याबाजूला घाटातली एक्स्प्रेसहायवे वरची गाड्यांची वर्दळ दिसत होती अशा वातावरणात मी, माझी आई आणि आमच्या सोबतचे ४ वारकरी उभे होतो.
त्या गावातली गावकरी बोलले होते कि एसटी थांबली तर तुमच नशीब कारण एवढ्या रात्री काही इथे गाड्या थांबत नाहीत. माझी चिंता अजून वाढत होती त्यात आमच्या सोबतची मंडळी रस्त्यावरच्या कोणत्याही कारला हात दाखवत होती. मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं कि आम्ही फक्त एसटी नेच जाणार.
रात्रीच्या अंधारात नेमका एसटी थांबा कुठे आहे हे कळतच नव्हत. आम्ही आपले अंधारात एका ठिकाणी त्या भीतीदायक वातावरणात उभे होतो. आमच्या सोबतचे वारकरी आम्हाला धीर देत होते कि माउली च्या कृपेने सगळे काही ठीक होईल.
[मी मनातल्या मनात म्हणत होतो कि माउलीचे आशीर्वाद आहेतच पण आता ह्यावेळी माझी एसटीच माझी माय माउली आहे आणि तीच आम्हाला साथ देईल ]
मात्र तरी अश्या कुठल्याही ठिकाणी रात्री एसटी आणि त्या सुद्धा सर्व लांब पल्ल्याच्या गाड्या थांबतील कि नाही अशी माझ्या मनात शंका होती
आणि तेवढ्यात लांबून ती आली, मी माझे कान टवकारून खात्री करून घेतली कि हि आपली एसटीच आहे. मग मी आणि आम्ही सर्वांनी हात केला ती सुसाट वेगाने आमच्याकडे येत होती आणि ती आता अश्याच सुसाट वेगात आमच्या समोरून जाणार असे मी मनात बोलत असतानाच मला बसच्या गिअर बदलल्याचा आवाज आला आणि मी सुटकेचा निश्वास सोडला. आमच्या समोर येताच तिचा वेग कमी झाला आणि माझी लाडकी एसटी आमच्या समोर थांबली.
ती होती जेजुरी- मुंबई सासवड आगाराची MH 14 BT 3502
कंडक्टरने गाडीत जागा नाही असे सांगितले मात्र आम्ही तरी गाडीत चढलो. अश्या भीतीदायक वातावरणातून बस मध्ये चढल्यावर मला खूप आपलेपणा जाणवला.
तो भयाण रस्ता, अंधार, ती शांतता, भीतीदायक वातावरण, माझ्या आईची काळजी ह्या सर्वांमधून मला सुटकेचा निश्वास सोडता आला तो फक्त ह्या एसटी मुळेच.
आणि त्यानंतर ह्या गाडीने वेग घेतला आणि ती सुसाट पळायला लागली ती इतकी पळत होती कि आम्हला तिने फक्त ४० मिनिटांमध्ये खंडाळा वरून पनवेलला पोहचवले
ती बस, ते चालक वाहक ह्यांचे अगदी मनापासून आभार.

Comments
Post a Comment