सीमेवरील जवानाला मिळवून दिली एसटीमध्ये जागा - श्रीकांत चांगण

नेहमी प्रमाणे मी बोरीवली नॅन्सी कॉलनी मध्ये एसटी चे फोटो काढत होतो. तसा मी दर शनिवारी आणि रविवारी बोरीवली नॅन्सी कॉलनी मध्ये फोटो क्लिक करायला जातोच. एसटी चे फोटो काढत असताना अर्नाळा-कोल्हापूर हि शिवशाही बस आली.ड्राइवर आणि कंडक्टर काका खाली उतरल्यावर मी त्या गाडीचे मस्त फोटो काढले..तेव्हा तिथे एक प्रवासी आला आणि मला विचारू लागला कि हि गाडी सातारा ला जाते का..मी म्हणलो जाते कि. मग त्याने कंडक्टर काका ना विचारल गाडीत जागा आहे का तर काका म्हणाले एक हि जागा नाही ..आणि खरचं गाडी अर्नाळा वरूनच फुल्ल भरून आलेलि ..

मी हे सगळं ऐकतच होतो.. मग मी त्याला म्हणलो कि मागून अर्नाळा कोल्हापूर साधी गाडी येत आहे तिने जा ..मग तो मला सांगू लागला कि अरे मी जम्मू वरून आलोय..चार दिवस नीट झोपलो हि नाही..मला अंदाज आलाच आणि मी म्हणालो बॉर्डर वर असता का..तो म्हणालो हो.. आणि खरंच त्याचा डोळ्या वरून मला जाणवलं कि ह्याची झोप झालेली नाही..तो म्हणत होता कसही करून मला आज पाचवड (सातारा येथील एक ठिकाण ) ला जायचं आहे..हि गाडी मिळाली तर 11 वाजे पर्यंत पोचेन आणि मला झोपता येईल नीट माझा घरी ..

तो मला विनंती करू लागला कि तुम्ही कंडक्टर शी बोला आणि काहीतरी ऍडजस्ट करा ..मी म्हटलं तुमचा साठी एवढं तरी केलंच पाहिजे..मग आम्ही दोघे कंडक्टर काका ना विनंती करू लागलो कारण गाडीत एक हि जागा शिल्लक न्हवति ..मी कंडक्टर काका ना म्हटलं घ्या हो एक सीट.करा काहीतरी ऍडजस्ट..बॉर्डर चा माणूस आहे.. जम्मू वरून आलाय ..शेवटी आमचा दोघांच कंडक्टर काका नो ऐकलं आणि त्या जवानाला गाडीत घेतलं..

हा अनुभव मी शेयर करणार न्हवतो पण आपला सैनिक काय काय सहन करतो हेच मला सांगायचं होत म्हणून मी शेयर केलं..
ड्राइवर काका आणि कंडक्टर काका दोघे कि खूप चांगले होते..त्या तिघांचा एकत्र फोटो काढायचं होता पण गाडीची वेळ झाली होती..तरी मी त्यानंच एक फोटो काढला ..

गाडी हि निघाली आणि मी हि माझा घराकडे निघालो ..घरी जात असताना एकच विचार येत होता कि तिघे हि (कंडक्टर ड्राइवर आणि सैनिक )फक्त आपला साठी आयुष्यभर झटत असतात .एक बॉर्डर वर आणि दोघे एसटी वर

Comments

Popular posts from this blog

एसटीला बोर्ड देणे - मार्गदर्शक सूचना

विदर्भाची बात काही औरच - श्रीकांत चांगण

माझा_बळी_का? (एसटी रडतेय...) - प्रथमेश गो. गुरव. (एसटी प्रेमी) सावंतवाडी.