एसटी कामगार अधिवेशन व एसटी प्रेमी

एसटी कामगार अधिवेशन व एसटी प्रेमी
नमस्कार मंडळी सध्या अधिवेशनासाठी सजलेल्या बऱ्याच एसटी बसचे फोटो ग्रुपवर येत आहेत. दिनांक १३ व १४ फेब्रुवारी २०२० रोजी कोल्हापूर येथे एसटीच्या कामगार संघटनेचे अधिवेशन आहे. बरेच एसटी प्रेमी सजलेल्या एसटींचे फोटो काढायला व पाहायला उत्सुक असतील. हे फोटो पाहिल्यावर नेहमीप्रमाणे  एखाद्या आगाराची गाडी कुठे आहे? आमची गाडी दिसली का? एसटी कामगार अधिवेशनात खाजगी बस कशी?  असे बरेच प्रश्न ग्रुपवर येतात. त्यासाठी सर्व एसटी प्रेमींनी ही पोस्ट वाचा. 

अत्यंत महत्वाचे -
MSRTC LOVERS GROUP च्या अगदी सुरुवातीपासूनच्या धोरणाप्रमाणे MLG चे सर्व एसटी प्रेमी अगदी स्पष्टपणे जाहीर करतात की आमचा ग्रुप कोणत्याही संघटना, राजकीय पक्ष, नेते ह्यांच्याशी कोणत्याही प्रकारे संबंधित नाही. एसटीच्या एकूणच प्रगतीसाठी हातभार लावणाऱ्या सर्वच घटकांचा आम्ही आदर करतो. 

कामगार अधिवेशनामध्ये कोणत्याही एसटी आगारातर्फे गाड्या पाठविल्या जात नाहीत. प्रत्येक आगारातील त्या संघटनेचे सभासद वर्गणी काढून एसटी बस प्रासंगिक करारावर पूर्ण पैसे भरून घेऊन येतात. तसेच उत्साहाच्या वातावरणामध्ये सदर कर्मचारी एसटीची सजावट करतात.
एखाद्या आगारामध्ये त्या संघटनेचे सदस्य कमी असल्यास त्यांना पूर्ण एसटी प्रासंगिक करारावर घेणे परवडत नाही अशावेळी मग काही आगारातील कर्मचारी आपली खाजगी वाहने, खाजगी बस, अथवा नियमित एसटीमधून प्रवास करून येतात. म्हणूनच कोणत्याही कामगार अधिवेशनामध्ये सर्वच एसटी आगारांच्या सजविलेल्या एसटी बसेस असतीलच असे नाही.

 कोणत्याही आगारांच्या सजावटीची कृपया तुलना करू नये. 
तेव्हा एखाद्या आगाराची गाडी कुठे आहे? आमची गाडी दिसली का? एसटी कामगार अधिवेशनात खाजगी बस कशी? ह्या आगाराची गाडी का नाही आली? ह्या प्रश्नांच्या फंदात न पडता आपल्या सर्वांच्या लाडक्या एसटीच्या
सुंदरतेचा आस्वाद घ्यावा. अतिशय सुरेख सजविलेल्या आपल्या एसटीचे एक वेगळेच रूप आपल्याला ह्यावेळी पाहायला मिळते.

Comments

Popular posts from this blog

एसटीला बोर्ड देणे - मार्गदर्शक सूचना

विदर्भाची बात काही औरच - श्रीकांत चांगण

माझा_बळी_का? (एसटी रडतेय...) - प्रथमेश गो. गुरव. (एसटी प्रेमी) सावंतवाडी.