एसटीचा पहिला पास - श्रीकांत चांगण

एसटी आणि एसटीचा प्रवास हा आपल्या सगळ्यांचा आवडता विषय.एसटीने कधी प्रवास करायला मिळतोय याचीच आपण वाट बघत असतो.आपल्या ग्रुपचे बरेच सदस्य ४/७ दिवसांचा पास काढून एसटीने प्रवास करत असतात.मी सुद्धा एसटीचा पास काढून एसटीने फिरायचं ठरवलं.मी प्लॅनला जातोय कळल्यावर रक्षित राऊत सुद्धा माझ्याबरोबर येण्यास तयार झाला.मग आम्ही आपल्या ग्रुपचे मॉडरेटर ललित यांच्याकडून प्लॅन बनवून घेतला.तो प्लॅन खालीलप्रमाणे होता.

परळ -- कोल्हापूर
कोल्हापूर -- गगनबावडा -- तरळा -- सावंतवाडी
सावंतवाडी -- पुणे
पुणे -- अहमदनगर
अहमदनगर -- कल्याण
कल्याण -- ठाणे
ठाणे -- बोरिवली

प्लॅन ठरल्यावर आम्ही प्लॅन कधी सुरु होतोय या दिवसाची वाट बघू लागलो.शेवटी तो दिवस आला.आमचा प्लॅनची सुरवात परळ- कोल्हापूर या गाडीने होणार होती त्यामुळे आम्ही गाडीला हार देण्याचं ठरवलं.मग मी ऑफिस मधून थोडा लवकरच निघालो आणि ट्रेन पकडली. रक्षित मला अंधेरी येथे भेटला आणि त्याच ट्रेनने आम्ही पुढे दादर येथे उतरलो.तिथे आम्ही २ हार घेतले आणि परळ डेपो मध्ये पोचलो.परळ डेपो मध्ये एका हिंदी चित्रपटाचं शूटिंग चालू होतं.जाणाऱ्या गाड्या वेगळ्या ठिकाणी लागत असल्यामुळे प्रवाशांचा गोंधळ उडत होता.आमचा गाडीची वेळ ११ ची असल्यामुळे आम्ही थोडस खाऊन घेतलं आणि पुन्हा परळ डेपोत आलो आणि एसटी बसेस बघू लागलो.

शेवटी ११ वाजता आमची गाडी लागली.आम्ही ड्राइव्हर आणि कंडक्टर काकांना गाडीला हार आणलेत असं सांगितलं आणि हार घालण्यास सांगितलं.मग गाडीला पुढे आणि मार्गफलकाला हार घातले गेले.ड्राईव्हवर काका आणि कंडक्टर काका दोघेही खूप खूष झाले.खरंच हार गाडीची शोभा नक्की वाढवतो.हा छोटासा कार्यक्रम झाला आणि आमचा प्रवासाला सुरवात झाली.

परळ मध्येच गाडी अर्धी भरलेली होती.मग पुढे कुर्ला येथे गाडी पूर्ण भरली.गाडी पूर्ण भरल्यामुळे आम्ही पनवेल येथे गेलो नाही आणि मग गाडीने सरळ एक्सप्रेसवे पकडला.खालापूर टोल नाका पुढे आम्ही एक छोटासा ब्रेक घेतला आणि पुन्हा प्रवासाला सुरवात झाली.पुढे बोरघाट येथे आम्हाला ट्रॅफिक चा भयंकर त्रास झाला.जवळपास २ तास आमची गाडी ट्रॅफिक मध्ये अडकली होती.पुढचा प्लॅनची वाट लागते कि काय असं वाटू लागलं.पण मनात इच्छा असेल तर ती पूर्ण होतेच..ट्रॅफिक मधून बाहेर पडल्यावर चालक काकांनी ड्रायविंग काय असते हे दाखवून दिल.बरोबर सकाळी ४:३० वाजता एक्सप्रेसवे संपला आणि तिथून थेट सकाळी ७:१५ वाजता चालक काकांनी गाडी सातारा येथील काशीळ या ठिकाणी नाश्ता करण्यासाठी थांबवली.येथे आम्हाला चालक काकांनी स्वतःहून चहा आणि पोहे दिले.हे पाहून गाडीतले प्रवाशी आम्हला विचारत होते कि 'तुम्ही एसटी कर्मचारी आहात का? आम्ही म्हटलं आम्ही एस्टीप्रेमी आहोत.हे ऐकून प्रवाशांना थोडस नवलं वाटलं.नाश्ता झाल्यावर पुन्हा गाडी मार्गस्थ झाली.गाडीत कराडचे प्रवाशी असल्यामुळे गाडी कराड स्थानकात गेली.तिथे प्रवाशांना सोडल्यावर गाडी पुन्हा कोल्हापूरचा दिशेने मार्गस्थ झाली.बरोबर सकाळी ९:१५ आम्ही कोल्हापूर येथे पोचलो.


कोल्हापूर मध्ये पोचल्यावर लगेच लगेच आपल्या ग्रुपचे सदस्य Sumant S. Kulkarni सर भेटले.हि भेट पूर्वनियोजित होती.मग मी आणि रक्षित ने सुमंत सर सोबत कोल्हापूर स्थानकात वेळ घालवला.मग सुमंत सर आम्हला फ्रेश होण्यासाठी एका हॉटेल मध्ये घेऊन गेले.तिथे फ्रेश झाल्यावर आम्ही पुन्हा कोल्हापूर स्थानकात आलो.रक्षित हा त्याचा गावी जाणार असल्यामुळे तो कोल्हापूर येथेच थांबला.मग मी दोघांचा निरोप घेतला आणि माझा पुढचा प्रवासाला सुरवात केली.मला पुढे गगनबावडा मार्गे सावंतवाडी येथे जायचं होत.या प्लॅनचा माझा मुख्य हेतू गगनबावडा घाट बघणे हाच होता.कोल्हापूर मधून मला पंढरपूर - विजयदुर्ग हि गाडी मिळाली.तेव्हा सकाळचे १०:३० वाजले होते.या गाडीने तरला येथे उतरून पुढे सावंतवाडी गाडी पकडण्याचं ठरवलं.

कोल्हापूर येथून गाडी निघाली आणि पुढचा प्रवास सुरु झाला.या गाडीने दुपारी १२:१५  गगनबावडा स्थानक गाठलं.मग आम्ही गगनबावडा स्थानक सोडलं आणि लगेच सुरु झाला तो गगनबावडा घाट.जो घाट मला बघायचा होता तो आता माझा डोळ्यांसमोर होता.एसटी आणि घाट हे समीकरण मला खूप आवडत. शाळेत गणितातली  समीकरण आली कि मी नाक मुरडायचो.गणितातली समीकरण दिसली कि माझी गाडी ब्रेकडाउन व्हायची.


गगनबावडा घाट सुरु झाला.मी विंडो सीट वरच बसल्यामुळे येणारा वारा मनाला आनंद देत होता.घाटातील पहिलंच अवघड वळण चालक काकांनी सहज पार केलं.घाटातून दिसणारं सौदर्य डोळ्याचं पारणं फेडत होत.खरंच गगनबावडा खूप छान घाट आहे.घाटातील वळणे मागे सारत घाट पूर्ण झाला..तिथून बरोबर दुपारी १:३० वाजता मी तरळा येथे पोचलो आणि सावंतवाडी गाडीची वाट पाहू लागलो.१० मिनिट्स नंतर विजयदुर्ग-गडहिंग्लज हि गाडी आली आणि मी त्या गाडीत जाऊन बसलो.या गाडीने कणकवली , कुडाळ करत मला संध्याकाळी ४:१५ वाजता सावंतवाडी येथे सोडलं.उतरल्या उतरल्या मी लगेच एक हॉटेल शोधलं आणि मस्त जेवण केलं.जेवण आटोपून मी पुन्हा सावंतवाडी बस स्थानकात आलो.येथे मला जुन्या गाड्या पण चांगल्या सुस्थित असलेल्या बघायला मिळाल्या.मी सुद्धा मग चांगलीच फॅनिंग केली.

मला पुण्याला जायचं असल्यामुळे मी पुणे-सावंतवाडी शिवशाही ची वाट बघू लागलो.६:४० मिनिटांनी गाडी प्लॅटफॉर्मला लागली आणि मी पटकन सीट पकडली.सावंतवाडी मध्येच गाडी अर्धी भरली होती.६:५० वाजता गाडी निघाली.पुढे आंबोली घाट, आजरा करत गडहिंग्लजचा थोडं पुढे जेवायला गाडी थांबली.त्या हॉटेलवर मी मस्त कोल्हापूरी तांबडा पांढरा रश्यावर ताव मारला.जेवण आटोपून पुन्हा गाडी मार्गस्थ झाली आणि निपाणी कागल करत आम्ही कोल्हापूर येथे रात्री ११:१५ वाजता पोचलो.माझा बाजूला कोणच नसल्यामुळे मी तिथेच आडवा झालो आणि थेट स्वारगेटला उठलो.पुढे अर्धा तासात गाडी वल्लभनगर ला पोचली.तेव्हा सकाळचे ४:३० वाजले होते.वल्लभनगर येथे उतरल्यावर मी फ्रेश झालो आणि नगरला जाणाऱ्या गाडीची वाट बघू लागलो.

५ वाजता पुणे-एरंडोल गाडी लागली आणि मी तिच्यात बसलो.५:१० मिनिटांनी गाडी निघाली आणि पुण्यातून बाहेर पडत पुणे - नगर हायवेला लागली.शिरूर चा पुढे पुणे-वाशीम गाडी बरोबर आमची चांगलीच रेसिंग लागली.दोन्ही गाड्या एकमेकांना ओव्हरटेक करत होत्या.खूप दिवसानंतर मला अशी रेसिंग बघायला मिळाली.

शेवटी आम्हीच पहिले स्वस्तिक बस स्थानक येथे पोचलो.पुढचा दोनच मिनटात पुणे-वाशीम गाडी सुद्धा आली .मग मी तिथे थोडंसं फॅनिंग केलं आणि तारकपूर स्थानक गाठलं.तारकपूर येथे पोचल्यावर थोडं फ्रेश होऊन मी दोन वडापाव खाल्ले आणि चांगली फँनिंग केली.नंतर मी कल्याणला जाणाऱ्या शिवशाहीची वाट बघू लागलो.बरोबर ९:३० अहमदनगर-कल्याण हि शिवशाही पकडली.

हि गाडी लगेच नगर -कल्याण हायवेला लागली.पुढे ओतूर आळेफाटा येथे प्रवाशी घेत गाडी मार्गस्थ झाली.आणि मग सुरु झाला तो माळशेज घाट.माळशेज घाट म्हणजे निसर्गाने दिलेलं एक वरदानच.या घाटातून दिसणारे उंच डोंगर मनाला आनंद देत होते.तसा मी माळशेज घाट दोन वेळा बघितला आहे परंतु एसटीतून मी पहिल्यांदाच माळशेज घाट बघत होतो.माळशेज घाट संपला आणि पुढे हॉटेल रेनबो हिल्स येथे जेवायला गाडी थांबली.जेवण झाल्यावर गाडी पुन्हा मार्गस्थ झाली.या गाडीने दुपारी २:३० वाजता कल्याण येथे सोडलं.मग कल्याण येथून ट्रेनने ठाणे स्टेशन गाठलं.तिथे आपल्या ग्रुपचा सदस्य पंकज याची भेट घेतली आणि त्याचा बरोबर थोडी फॅनिंग केली.मग त्याचा निरोप घेत मी ठाणे-बोरिवली हि शिवशाही पकडली आणि ५:३० वाजता मी बोरिवली येथे उतरलो.अशा प्रकारे माझा प्लॅन पूर्ण झाला.


हा प्लॅन बनवून देणाऱ्या आणि प्रवासात वेळोवेळी मार्गदर्शन करणाऱ्या Lalit Bhojane यांचे मनापासून धन्यवाद.

या प्रवासात मला बरेच अनुभव मिळाले.एसटीचा प्रवासात वेळ कसा गेला ते कळलंच नाही.एसटीचा प्रवास नेहमीच मनाला आनंद देतो.या पुढील प्रवास सुद्धा एसटीनेच व्हावा एवढीच अपेक्षा.

धन्यवाद
श्रीकांत चांगण

Comments

Popular posts from this blog

एसटीला बोर्ड देणे - मार्गदर्शक सूचना

विदर्भाची बात काही औरच - श्रीकांत चांगण

माझा_बळी_का? (एसटी रडतेय...) - प्रथमेश गो. गुरव. (एसटी प्रेमी) सावंतवाडी.