"मानाचा एसटी प्रेमी" पुरस्कार जानेवारी २०२०

*MSRTC LOVERS GROUP तर्फे देण्यात येणारा "मानाचा एसटी प्रेमी"  पुरस्कार जानेवारी २०२० रोजी   MLG चे सदस्य श्री. दिलीप परीट ह्यांना जाहीर होत आहे. सर्व MLG सदस्यांच्या साक्षीने त्यांनी ह्या पुरस्काराचा स्वीकार करावा ही विनंती.

  श्री. दिलीप परीट सर हे कोल्हापूरचे रहिवासी असून संभाजीनगर आगारासोबत त्यांची विशेष बांधिलकी आहे.

अनेक एसटी कर्मचाऱ्यांसोबत त्यांचा स्नेह असून त्यांना मदत करण्यासाठी दिलीप सर कायम पुढे असतात. मागे संप काळात त्यांनी आगारात असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना मोफत चहा फराळाचे वाटप केले होते.

कोल्हापुरातून निघणाऱ्या सौन्दत्ती यात्रेसाठी जाणाऱ्या ग्रुप बुकिंगच्या गाड्या सजविण्यात त्यांचा नेहमीच मोलाचा वाटा असतो. अशा सौंदत्ती यात्रेसाठी सजविलेल्या अनेक जुन्या गाड्यांच्या फोटोंचा दुर्मिळ खजिना दिलीप सरांकडे आहे.

कोल्हापूरला जाणाऱ्या आपल्या प्रत्येक ग्रुप सदस्याला भेटायला ते सुमंत काकांसोबत हजर असतात. अगदी रात्रीच्या वेळीसुद्धा दिलीप सर     MLG सदस्यांना भेटायला बसस्थानकावर येतात.

आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या   MLG  सोबत ते कायम एकनिष्ठ आहेत. म्हणूनच   MLG च्या ऍडमिन टीमने हा प्रथम पुरस्कार त्यांना बहाल करण्याचा निर्णय घेतलेला आहे.  

Comments

Popular posts from this blog

एसटीला बोर्ड देणे - मार्गदर्शक सूचना

विदर्भाची बात काही औरच - श्रीकांत चांगण

माझा_बळी_का? (एसटी रडतेय...) - प्रथमेश गो. गुरव. (एसटी प्रेमी) सावंतवाडी.