कोल्हापूर आणि तळकोंकण दौरा - आशिष जाधव
** खूप दिवसांपासून कोल्हापूर आणि तळकोंकणात जाण्याची इच्छा होती. लागोपाठ आलेल्या सुटट्यानचा मुहूर्त बघून १४ आणि १५ नोव्हेंबर दिवस निशिच्त केला.
ठरल्या प्रमाणे १४ नोव्हेंबर शनिवार रोजी प्रवासास सुरुवात झाली.
* कल्याण ते पनवेल असा प्रवास शाही कुंभमेळा साठी विशेष बांधणी करण्यात आलेल्या BT ४४८१ ने झाला.
* कल्याण ते पनवेल असा प्रवास शाही कुंभमेळा साठी विशेष बांधणी करण्यात आलेल्या BT ४४८१ ने झाला.
त्यानंतर मात्र दिवाळी नंतर झालेली प्रचंड गर्दी व खचा- खच भरून येणाऱ्या गाड्या यामुळे काही काळ प्रतीक्षा करावी लागली व सरळ कोल्हापूर गाठण्याचा प्लान रदद्द करावा लागला
खूप उशीर झाल्याने शेवटी मिळेल ती गाडी पकडून पुणे गाठायचे ठरवले.
* त्याच वेळी मुंबई - हैदराबाद BT 3959 पनवेल स्थानकात दाखल झाली.
* त्याच वेळी मुंबई - हैदराबाद BT 3959 पनवेल स्थानकात दाखल झाली.
ह्या गाडीतही गर्दी असल्याने चांदणी चौक पर्यंत उभ्याने प्रवास केला.
मजल-दरमजल करत स्वारगेट गाठले व तिथून शिवाजीनगर ला जाऊन रात्रौ ८.३० ला सुटणारी
* पुणे - पणजी (निमआराम ) BT ३२८७ ने पणजी कडे वाटचाल सुरु केली.
ह्या वेळी मी मात्र मी माझी आवडती cabin seat मिळवण्यात यशस्वी झालो होतो.
* पुणे - पणजी (निमआराम ) BT ३२८७ ने पणजी कडे वाटचाल सुरु केली.
ह्या वेळी मी मात्र मी माझी आवडती cabin seat मिळवण्यात यशस्वी झालो होतो.
काही काळ उशिरा सुटलेली गाडी हायवेला येताच तिचा रंग दाखवू लागली होती....
चिंचवड - रत्नागिरी SL सोबत ची जुगलबंदी पासून दिवस भराचा थकवा कुठल्या कुठे निघून गेला
राधानगरी ते फोंडा या घनदाट अरण्यातून निघून पहाटे आम्ही कोकणात प्रवेश केला व फोंडा - कणकवली - कुडाळ - सावंतवाडी असे टप्पे ओलांडत सकाळी ८.१५ ला पणजी मध्ये हजर झालो.
वेळेच्या कमतरतेमुळे जास्त वेळ न घालवता लगेचच परतीच्या प्रवासाला सुरुवात केली व सकळी १० * वाजता सुटणाऱ्या पणजी - कोल्हापूर ने निघून सायंकाळी ५ वाजता कोल्हापूर येतो आलो.
संपूर्ण stand प्रवाशांनी फुलले होते. मुंबई आणि स्वारगेट कडे जाणर्या सर्व गाड्या ओसंडून वाहत होत्या.
परंतु कोल्हापूर depot ने सुरु केलेल्या जादा वाहतुकीमुळे सर्व काही सुरळीत चालू होते.
परंतु कोल्हापूर depot ने सुरु केलेल्या जादा वाहतुकीमुळे सर्व काही सुरळीत चालू होते.
* अशातच कुरुंदवाड डेपोतच्या जादा कोल्हापूर - स्वारगेट (विना थांबा ) ने प्रवासास सुरुवात केली व स्वारगेट येथे सकाळी ३ वाजता पोहोचलो आणि काही वेळातच मागून आलेल्या ढेबेवाडी - विठ्ठलवाडी ने निघून कल्याण येथे सकाळी ८ वाजता २ दिवसांच्या प्रवासाची सांगता केली.
संकेत ने अगदी वेळोवेळी सांगितलेले schedules न माहिती यामूळेच हा प्रवास यशस्वीरित्या पूर्णत्वास आला, त्या बद्दल त्याचे आभार!!!
Comments
Post a Comment