एसटीविषयक प्रश्नमंजुषा - स्पष्टीकरणासहित उत्तरे.
एसटीविषयक प्रश्नमंजुषा - स्पष्टीकरणासहित उत्तरे.
MSRTC LOVERS GROUP च्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त ४ मे २०२० रोजी घेण्यात आलेल्या ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धेची स्पष्टीकरणासहित उत्तरे पुढील प्रमाणे - पर्याय
१. एसटीच्या मुंबई सेंट्रल येथील मुख्यालयाचे नाव काय?
१. एसटी वाहतूक भवन.
२. महाराष्ट्र एसटी भवन.
३. महाराष्ट्र वाहतूक भवन.
४. महाराष्ट्र वाहतूक मुख्यालय.
स्पष्टीकरण - एसटी मध्यवर्ती कार्यालयाच्या इमारतीला
महाराष्ट्र वाहतूक भवन.हे नाव असून इमारतीच्या सर्वात वर हे नाव लिहिलेलेआहे.
२. एसटी महामंडळाचा अधिकृत टोल फ्री क्रमांक कोणता?
१. १८००१२२२५०
२. १८००२२१२५०
३. १८००२११२५०
४. १८००२२२१५०
स्पष्टीकरण -
१८००२२१२५० हा
एसटी महामंडळाचा अधिकृत टोल फ्री क्रमांक असून त्यावर प्रवाशांना माहिती पुरविली जाते.
३. सध्या महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री कोण आहेत?
१. श्री.दिवाकर रावते.
२. ॲड. श्री. अनिल परब.
३. श्री. उद्धव ठाकरे.
४. श्री. अशोक चव्हाण.
स्पष्टीकरण - सध्या स्थापन झालेल्या सरकारमध्ये ॲड. श्री. अनिल परब हे महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री आहेत
४. पूर्वी धुळे विभागातून राजस्थान राज्यात जाणारा एक नियमित मार्ग कोणता होता?
१. नाशिक - उदयपूर.
२. नंदुरबार - रेवदर.
३. धुळे - माउंट अबू
४. शहादा - उदयपूर.
स्पष्टीकरण - धुळे आगारातर्फे धुळे - माउंट अबू हा पूर्वी नियमित मार्ग होता.धुळे येथून दुपारी ४ वाजता बस निघायची. आता सुद्धा कधी कधी दिवाळी अथवा उन्हाळी हंगामात धुळे अंबाजी हा मार्ग सुरु करण्यात येतो.
५. एसटीतर्फे कोणत्या केंद्रशासित प्रदेशात बससेवा पुरविली जाते?
१. गोवा.
२. दादरा नगर व हवेली.
३. दमण.
४. दीव.
स्पष्टीकरण -
केंद्रशासित प्रदेश
दादरा नगर व हवेली ह्याची राजधानी सिल्वासा येथे आपल्या एसटीची नियमित बससेवा आहे. जव्हार येथून सिल्वासा सुमारे ६० किमी वर असून जव्हार, नाशिक, शिर्डी, नगर ह्याठिकाणाहून सिल्वासा येथे जाण्यासाठी बससेवा उपलब्ध आहे.
६. सर्वात पहिली शिवशाही बस कोणत्या मार्गावर धावली?
१. पुणे - पणजी.
२. मुंबई - कोल्हापूर.
३. मुंबई रत्नागिरी.
४. मुंबई - अलिबाग.
स्पष्टीकरण - १० जून २०१७ रोजी सर्वप्रथम मुंबई ते रत्नागिरी.या मार्गावर एसटीची नवीन शिवशाही बस धावली.
७. एसटीच्या ताफ्यातील व्होल्वो व स्कॅनिया कंपनीच्या मल्टिएक्सेल बसेसना कोणते नाव दिलेले आहे?
१. महाबस.
२. शिवनेरी.
३. हिरकणी.
४. अश्वमेध.
स्पष्टीकरण - व्होल्वो व स्कॅनिया कंपनीच्या मल्टिएक्सेल बसेसना अश्वमेध हे नाव दिलेले आहे.
व्होल्वो व स्कॅनिया कंपनीच्या सिंगल एक्सेल बसेसना शिवनेरी हे नाव आहे. एशियाड बसेसचे नवीन नामकरण हिरकणी असे केलेले आहे. तसेच पूर्वी प्रायोगिक तत्वावर महाबस या नावाखाली आरामदायी बसेस चालविण्यात येत होत्या.
८. शालेय विद्यार्थ्यांना मासिक पास काढताना प्रवास भाड्यात एकूण किती टक्के सवलत मिळते?
१. ६६.६६ %
२. ५०%
३. ३३.३३%
४. ७५.५० %
स्पष्टीकरण -
शालेय विद्यार्थ्यांना मासिक पास काढताना प्रवास भाड्यात एकूण
६६.६६ % सवलत मिळते. म्हणजेच विद्यार्थ्यांना फक्त ३३.३३% प्रवास भाडे भरून पास मिळतो. सदर सवलत शालेय शिक्षण विभागामार्फत देय असते.
९. नजीकच्या काळात पुढील पैकी कोण एसटी महामंडळाचे अध्यक्ष होते मात्र परिवहनमंत्री नव्हते?
१. श्री. दिवाकर रावते.
२. श्री. शरद पवार.
३. श्री. सुधाकरपंत परिचारक.
४. श्री. अनिल परब.
स्पष्टीकरण -
श्री. सुधाकरपंत परिचारक. हे एसटी महामंडळाचे अध्यक्ष होते मात्र ते परिवहन मंत्री नव्हते.
१०. पुढील पैकी कोणत्या मार्गावर शिवनेरी बससेवा धावली नाही?
१. दादर - बारामती.
२. मुंबई- रत्नागिरी.
३. मुंबई - नागपूर.
४. नागपूर - हैद्राबाद.
स्पष्टीकरण -
मुंबई- रत्नागिरी मार्गावर आतापर्यंत एकदाही शिवनेरी बससेवा धावली नाही.
दादर - बारामती व
नागपूर - हैद्राबाद.ह्या मार्गावर काही कालावधी साठी शिवनेरी बससेवा होती. तसेच डिसेंबर २०१५ मध्ये हिवाळी अधिवेशनाच्या काळात
मुंबई - नागपूर.मार्गावर शिवनेरी सेवा सुरु करण्यात आली होती.
११. एसटी महामंडळाच्या ताफ्यात नव्याने सामील झालेली सीटर + स्लीपर बस सर्वप्रथम कोणत्या मार्गावर धावली?
१. पुणे - शहादा.
२. ठाणे - सोलापूर.
३. परळ - भटवाडी
४. पुणे - पणजी.
स्पष्टीकरण - नोव्हेंबर २०१९ मध्ये सर्वप्रथम परळ - भटवाडी मार्गावर एसटीची
सीटर + स्लीपर बस सर्वप्रथम धावली . गारगोटी आगार कोल्हापूर विभाग ह्यांच्यातर्फे हा मार्ग चालविला जातो. सध्या महाराष्ट्रभर नवीन
सीटर + स्लीपर बसचे अनेक मार्ग सुरु झालेले आहेत.
१२. पुढील पैकी कोणत्या मार्गावर विनावाहक बससेवा उपलब्ध नाही?
१. मुंबई - भिवंडी.
२. पनवेल- अलिबाग.
३. नागपूर - अमरावती.
४. कल्याण - भिवंडी.
स्पष्टीकरण - पनवेल- अलिबाग, नागपूर - अमरावती, कल्याण - भिवंडी ह्या मार्गांवर थेट प्रवासी उपलब्ध असल्याने विना वाहक सेवा आहेत. मात्र
मुंबई - भिवंडी.
मार्गावर विनावाहक बससेवा उपलब्ध नाही.
१३.आवडेल तेथे प्रवास योजनेमध्ये किती दिवसांचे पास मिळतात?
१. २ दिवस व ६ दिवस.
२. ४ दिवस व ८ दिवस.
३. ५ दिवस व १० दिवस.
४. ४ दिवस व ७ दिवस.
स्पष्टीकरण -
आवडेल तेथे प्रवास योजनेमध्ये सध्या ४ दिवस व ७ दिवस असे पास मिळतात. आधी १० दिवसांचे पास मिळायचे त्याऐवजी आता ७ दिवसांचे पास मिळतात.
१४. महाराष्ट्र - गुजरात - महाराष्ट्र असा प्रवास करणारा एसटीचा पुढीलपैकी मार्ग कोणता?
१. विरार - नंदुरबार.
२. डहाणू -नंदुरबार.
३. वसई - नंदुरबार.
४. मुंबई - शहादा.
स्पष्टीकरण - डहाणू आगार पालघर विभाग ह्यांचा डहाणू -नंदुरबार हा एक नियमित मार्ग आहे. ह्या गाडीचा मार्ग डहाणू - वापी - वलसाड - नंदुरबार असा आहे. म्हणजेच ह्या एसटीचा प्रवास महाराष्ट्र राज्यात सुरु होतो गुजरात राज्यात प्रवेश करून पुन्हा महाराष्ट्र मध्ये संपतो.
१५. पुढीलपैकी कोणत्या शहरातून मध्यप्रदेशची राजधानी भोपाळ येथे जाण्यासाठी एसटीची बससेवा उपलब्ध आहे?
१. नागपूर.
२. धुळे.
३. अकोला
४. अमरावती.
स्पष्टीकरण - अमरावती २ [बडनेरा] आगार ह्यांच्या तर्फे अमरावती ते भोपाळ ह्या मार्गावर नियमित बससेवा आहे. अमरावती - मोर्शी - वरुड - बैतुल - मुलताई - इटारसी - हौशंगाबाद - भोपाळ असा हा मार्ग आहे. दोन्हीकडून सकाळी ७ वाजता ही बस सुटते.
१६. एसटी महामंडळामध्ये पूर्वी प्रवाशांसाठी मिळणाऱ्या वार्षिक सवलत कार्डाचे मूल्य किती होते?
१. ५०० रुपये.
२. ३०० रुपये.
३. २०० रुपये.
४. २५० रुपये.
स्पष्टीकरण -
वार्षिक सवलत कार्डाचे मूल्य
२०० रुपये होते. ह्यात १८ किमी वरील प्रवास असेल तर प्रवास भाड्यात १०% सूट मिळत असे. सध्या ही योजना बंद आहे.
१७. सध्या हिरकणी बससेवेसाठी आरक्षण आकार किती आकारण्यात येतो?
१. १० रुपये.
२. ५ रुपये.
३. १५ रुपये.
४. ७ रुपये.
स्पष्टीकरण -
सध्या हिरकणी बससेवेसाठी ५ रुपये
आरक्षण आकार आकारण्यात येतो. आधी हा आरक्षण आकार ७ रुपये होता. मात्र एसटीने सर्वच प्रवासी भाडे ५ व १० रुपयांच्या पटीत केल्यामुळे हे आरक्षण शुल्क आता ५ रुपये करण्यात आले आहे.
१८. एसटी महामंडळाच्या ताफ्यात नव्याने सामील झालेल्या सीटर + स्लीपर बस मध्ये एकूण शयन क्षमता व आसन क्षमता किती आहे?
१.
शयन क्षमता - ३० व आसन क्षमता - १५.
२.
शयन क्षमता - २० व आसन क्षमता - २०.
३.
शयन क्षमता - १५ व आसन क्षमता - ३०.
४.
शयन क्षमता - १० व आसन क्षमता - ४०.
स्पष्टीकरण - नवीन
सीटर + स्लीपर बसमध्ये एकूण १५ बर्थ आहेत तर पुशबॅक प्रकारातील एकूण ३० आसने आहेत.
१९. आवडेल तेथे प्रवास योजनेअंतर्गत मिळणाऱ्या ४ व ७ दिवसांच्या पासवर अपघात सहायता निधी किती आकारण्यात येतो?
१. २ रुपये.
२. ३ रुपये.
३. ५ रुपये.
४. ७ रुपये.
स्पष्टीकरण -
४ व ७ दिवसांच्या पासवर ५ रुपये.अपघात सहायता निधी आकारण्यात येतो इतर तिकिटांवर प्रत्येकी १ रुपया इतका
अपघात सहायता निधी आकारण्यात येतो.
०
२०. सर्वसामान्य प्रवाशांना किती दिवसांचे प्रवास भाडे भरून ३० दिवसांचा पास मिळतो?
१. १५ दिवस.
२. २० दिवस.
३. २५ दिवस.
४. २१ दिवस.
स्पष्टीकरण - एकाच मार्गावर नियमितपणे प्रवास करणाऱ्या नोकरदार व अन्य प्रवाशांना २०
दिवसांचे प्रवास भाडे भरून ३० दिवसांचा पास मिळतो.
२१. महाराष्ट्र - तेलंगणा - महाराष्ट्र असा प्रवास करणारा एसटीचा पुढीलपैकी मार्ग कोणता?
१. लातूर - चंद्रपूर.
२. नांदेड - हैद्राबाद.
३. नांदेड - गडचिरोली.
४. नागपूर - आदिलाबाद.
स्पष्टीकरण - किनवट आगार नांदेड विभाग ह्यांचा लातूर ते चंद्रपूर असा नियमित मार्ग आहे.सदर बसचा मार्ग - चंद्रपूर - राजुरा - गडचांदूर - कोरपना - आदिलाबाद - किनवट - भोकर - नांदेड - अहमदपूर - लातूर.
२२. दिव्यांग व्यक्तींना परिवर्तन बसमध्ये प्रवास भाड्यात किती टक्के सवलत मिळते ?
१. ४० %
२. ७५ %
३. ५०%
४. २५%
स्पष्टीकरण - दिव्यांग व्यक्तींना परिवर्तन बसमध्ये प्रवास भाड्यात
७५ % सवलत मिळते. म्हणजेच त्यांना फक्त २५% प्रवास भाडे भरावे लागते.
२३. महाराष्ट्र राज्यांतर्गत पूर्वी बराच काळ सुरु असणारा सर्वात लांबचा मार्ग कोणता?
१. शिर्डी - नागपूर.
२. मुंबई -पुसद.
३. पुणे - नागपूर.
४.शिर्डी - अहेरी.
स्पष्टीकरण - अहेरी आगार गडचिरोली विभाग ह्यांचा पूर्वी अहेरी ते शिर्डी असा नियमित मार्ग होता. सदर मार्ग महाराष्ट्र राज्य अंतर्गत सर्वात लांबचा मार्ग होता. सुमारे ९०० किमीचा हा मार्ग होता. अहेरी - चंद्रपूर - वर्धा - अमरावती - अकोला - चिखली - औरंगाबाद - नेवासा - शिर्डी असा हा मार्ग होता.
२४. शिवशाही स्लीपर बसमध्ये ज्येष्ठ नागरिकांना प्रवास भाड्यात किती टक्के सवलत मिळते ?
१. ३० %
२. ७५ %
३. ५०%
४. २५%
स्पष्टीकरण - वातानुकूलित
शिवशाही स्लीपर बसमध्ये ज्येष्ठ नागरिकांना प्रवास भाड्यात
३० %
सवलत मिळते.
२५. सर्वात कमी आगार असलेला एसटीचा विभाग कोणता?
१. जालना.
२. वर्धा.
३. चंद्रपूर.
४. गडचिरोली.
स्पष्टीकरण - नव्याने सुरु झालेल्या गडचिरोली विभागात फक्त ३ आगारांचा समावेश होतो. १. गडचिरोली आगार, २. अहेरी आगार, ३. ब्रह्मपुरी आगार. यापूर्वी हे तीनही आगार चंद्रपूर विभागात होते.
२६. २०१५ साली नाशिक त्र्यंबकेश्वर येथे झालेल्या कुंभमेळा साठी एसटीने काही विशेष बसगाड्यांची बांधणी केली होती. सदर बसचा रंग कोणता?
१. लाल.
२. हिरवा.
३. निळा.
४. पिवळा.
स्पष्टीकरण - २०१५ साली नाशिक त्र्यंबकेश्वर येथे झालेल्या कुंभमेळा साठी एसटीतर्फे विशेष वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले होते. त्यावेळी एसटीने खास कुंभमेळा वाहतुकीसाठी सुमारे २०० बस गाड्यांची बांधणी आपल्या कार्यशाळांमध्ये केली होती. सदर बसेसचा रंग हिरवा आहे.
२७. एसटी महामंडळाचे सध्याचे व्यवस्थापकीय संचालक कोण आहेत?
१. श्री. दीपक कपूर.
२. श्री. शेखर चन्ने.
३. सौ. अश्विनी भिडे.
४. श्री. रणजितसिंह देओल.
स्पष्टीकरण -
श्री. शेखर चन्ने. हे एसटी महामंडळाचे सध्याचे प्रभारी व्यवस्थापकीय संचालक आहेत.
श्री. रणजितसिंह देओल.ह्यांची बदली झाल्यानंतर त्यांची नियुक्ती करण्यात आली.
२८. पुढीलपैकी कोणते एसटी बसचे नाव नाही?
१. शिवशाही
२. शिवनेरी
३. यशवंती.
४. रोहिणी.
स्पष्टीकरण - शिवशाही, शिवनेरी व यशवंती ही सर्व एसटी बसेसची नवे आहेत. शिवशाही - नवीन वातानुकूलित बसेस, शिवनेरी - व्होल्वो व स्कॅनिया कंपनीच्या बसेस. यशवंती - मिडी बसेस.
२९. मानव विकास कार्यक्रमांतर्गत एसटीला मिळालेल्या बसगाड्यांचा रंग कोणता आहे?
१. लाल.
२. हिरवा.
३. निळा.
४. नारिंगी.
स्पष्टीकरण - महाराष्ट्र राज्याच्या मानव विकास अहवालानुसार जे तालुके मानव विकास निर्देशांकात पिछाडीवर आहेत अशा तालुक्यांमध्ये मानव विकास कार्यक्रमांतर्गत शिक्षणाचा स्तर उंचावण्यासाठी खास दुर्गम भागातील शालेय मुलींना शाळेत ने - आण करण्यासाठी विशेष बसगाड्या एसटीला देण्यात आल्या. ह्यातून प्रामुख्याने शालेय विद्याथिनिंची वाहतूक शाळेच्या वेळेत करण्यात येते. इतर वेळी ह्या बसेस स्थानिक मार्गांवर वापरण्यात येतात. ह्या बसेस फक्त नेमून दिलेल्या तालुक्यातील आगारांमध्येच आहेत. सदर बसेसचा रंग निळा आहे.
३०. तळेगावं नावाचे आगार कोणत्या दोन विभागांमध्ये आहे?
१. पुणे व अमरावती विभाग.
२. पुणे व चंद्रपूर विभाग.
३. पुणे व वर्धा विभाग.
४. पुणे व नागपूर विभाग.
स्पष्टीकरण -
पुणे व वर्धा विभाग ह्या दोन्ही विभागांमध्ये तळेगाव नावाचे आगार आहेत. तसेच मलकापूर नावाचा आगार बुलढाणा व कोल्हापूर अशा दोन्ही विभागात आहे.
३१. महाराष्ट्रातील असे कोणते थंड हवेचे ठिकाण आहे जेथे जाण्यासाठी एसटीच्या ताफ्यात खास कठीण घाट चढणाऱ्या २ बसेस आहेत. सदर प्रकारच्या फक्त २ च बस संपूर्ण एसटीमध्ये आहेत.
१. महाबळेश्वर.
२. माथेरान.
३. चिखलदरा.
४. तोरणमाळ.
स्पष्टीकरण - माथेरान ता. कर्जत, जि. रायगड हे सुमारे ८०० मीटर उंचीवरील थंड हवेचे ठिकाण आहे. येथे पोहोचण्यासाठी अतिशय अवघड असा घाट रस्ता चढून जावे लागते. येथे प्रवासी वाहतूक करण्यासाठी टाटा कंपनीच्या २ विशेष मिडीबसेस एसटीच्या कर्जत आगाराकडे आहेत. ह्या बसेस कर्जत - नेरळ- माथेरान ह्या मार्गावर सेवा देत असतात.
३२. पुढीलपैकी कोणत्या हंगामात एसटीकडून तात्पुरती भाडेवाढ केली जाते?
१. उन्हाळी हंगाम.
२. दिवाळी हंगाम..
३. गणपती ज्यादा वाहतूक.
४. पावसाळी वाहतूक.
स्पष्टीकरण - मागील काही वर्षांपासून एसटीकडून दिवाळी हंगामात तात्पुरती [सुमारे १५ दिवस] भाडेवाढ [१०%] केली जाते
३३. एसटी साठी बस बांधणी करणाऱ्या Antony बॉडी बिल्डर यांची बस बांधणी कार्यशाळा कुठे आहे?
१. ओझर, नाशिक.
२. रसायनी, रायगड.
३. बुटीबोरी, नागपूर
४. भोसरी, पुणे.
स्पष्टीकरण -
रसायनी ता. खालापूर जि. रायगड येथे
Antony बस बॉडी बिल्डर यांची बस बांधणी कार्यशाळा आहे. येथे एसटीच्या शिवशाही, हिरकणी अशा विविध बसेसची बांधणी झालेली आहे.
३४. एसटी साठी बस बांधणी करणाऱ्या ACGL ह्या कंपनीच्या नावाचे पूर्ण स्वरूप काय आहे?
१. Automotive Corporation of Gujarat Limited.
२. Automobile Corporation of Goa Limited.
३. Automotive Corporation of Goa Limited.
४. Automobile Corporation of Gujarat Limited.
स्पष्टीकरण -
Automobile Corporation of Goa Limited [ACGL] ह्यांच्याकडून एसटीची हिरकणी, यशवंती, स्कुल बसेस अशा अनेक बसगाड्यांची बांधणी झालेली आहे.
३५. सुरगाणा बसस्थानक कोणत्या विभागात येते?
१. अमरावती विभाग.
२. नागपूर विभाग.
३. धुळे विभाग.
४. नाशिक विभाग.
स्पष्टीकरण -
सुरगाणा बसस्थानक
नाशिक
विभागात येते. नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम भागात गुजरात राज्याच्या सीमेलगत सुरगाणा तालुक्यात हे बसस्थानक आहे. कळवण आगारातर्फे येथे बससेवा चालविली जाते.
३६. सर्वात पहिली शिवनेरी स्लीपर बससेवा कोणत्या मार्गावर सुरु झाली?
१. मुंबई - बेंगळुरू.
२. पुणे - नागपूर.
३. मुंबई - पणजी.
४. बोरिवली -कोल्हापूर.
स्पष्टीकरण -
सर्वात पहिली शिवनेरी स्लीपर बससेवा
मुंबई - बेंगळुरू ह्या मार्गावर जून २०१४ मध्ये सुरु झाली.
३७. सर्वात पूर्वेकडे जाणारा एसटीचा मार्ग कोणता?
१. गोंदिया - रायपूर.
२. अमरावती - जबलपूर.
३. नागपूर - रायपूर.
४. गडचिरोली - धर्मपुरी.
स्पष्टीकरण - छत्तीसगढ राज्याची राजधानी रायपूर येथे जाणारा नागपूर ते रायपूर हा मार्ग वर्धमान नगर आगार नागपूर ह्यांच्या कडून चालविला जातो. हाच आपल्या एसटीचा सर्वात पूर्व दिशेला जाणारा मार्ग आहे.
३८. कुऱ्हा बसस्थानक कोणत्या विभागात येते?
१. नागपूर विभाग.
२. अमरावती विभाग.
३. लातूर विभाग.
४. रत्नागिरी विभाग.
स्पष्टीकरण -
कुऱ्हा बसस्थानक
अमरावती
विभागात येते. ता. तिवसा जि. अमरावती. आर्वी ते अमरावती मार्गावर हे एक छोटे बसस्थानक आहे.
३९. नेर आगार कोणत्या विभागात येतो?
१. बुलढाणा विभाग.
२. यवतमाळ विभाग.
३. भंडारा विभाग.
४. नांदेड विभाग.
स्पष्टीकरण - नेर आगार कोणत्या
यवतमाळ
येतो. यवतमाळ ते अमरावती मार्गावरील हा एक महत्वाचा आगार आहे.
४०. आंध्र प्रदेश राज्यातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र ज्याठिकाणी सोलापूर आगाराने विशेष बससेवा काही दिवस सुरु केली होती?
१. सोलापूर ते हंपी.
२. सोलापूर ते गोकर्ण.
३. सोलापूर ते श्रीशैलम.
४. सोलापूर ते महाबलीपूरम.
स्पष्टीकरण - २०१९ ह्या वर्षात गुढीपाडव्याच्या सुमारास प्रवासी मागणीनुसार सोलापूर आगाराने सोलापूर ते श्री शैलम ह्या मार्गावर हिरकणी बससेवा सुरु केली होती. महाराष्ट्र - कर्नाटक - तेलंगणा - आंध्र प्रदेश अशा ४ राज्यातून ह्या बसचाच प्रवास होत असे.
४१. पुणे विभागात एकूण किती आगार आहेत?
१. १३ आगार.
२. १४ आगार.
३. ११ आगार.
४. १५ आगार.
स्पष्टीकरण - पुणे विभागात एकूण
१३
आगार आहेत. १. स्वारगेट, २. शिवाजीनगर, ३. पिंपरी चिंचवड, ४. तळेगाव, ५. सासवड, ६. इंदापूर, ७. बारामती, ८. बारामती MIDC, ९. राजगुरूनगर, १०. नारायणगाव, ११. दौंड, १२. शिरूर, १३.भोर.
४२. मध्य प्रदेशातील एक प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण ज्याठिकाणी नागपूर आगारातर्फे महाशिवरात्री निमित्त विशेष ज्यादा बसेस सोडण्यात येतात?
१. भेडाघाट.
२. उज्जैन.
३. पंचमढी.
४. सांची.
स्पष्टीकरण - पंचमढी हे मध्य प्रदेशातील एक प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण आहे. येथे महाशिवरात्री निमित्त महादेवाची मोठी यात्रा भरते. त्यावेळी भाविकांसाठी
नागपूर आगारातर्फे विशेष ज्यादा बसेस सोडण्यात येतात
४३. गणपती विशेष ज्यादा वाहतूक व्यवस्था अंतर्गत मुंबई परिसरातून कोणत्या प्रदेशात एसटी बसेस जातात?
१. खान्देश.
२. कोकण.
३. मराठवाडा.
४. विदर्भ.
स्पष्टीकरण -
गणपती विशेष ज्यादा वाहतूक व्यवस्था अंतर्गत मुंबई परिसरातून
कोकण
प्रदेशात एसटी बसेस जातात. कोकणात गणपतीचा उत्सव घरोघरी मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. मुंबई परिसरातून चाकरमान्यांसाठी सुमारे २ ते ३ हजार ज्यादा बसेस सोडण्यात येतात.
४४. एसटीमधील कोणत्या विभागाची हिरकणी बस प्रासंगिक करारावर थेट जम्मू काश्मीर राज्यात जाऊन आलेली आहे?
१. मुंबई.
२. सांगली.
३. सातारा.
४. पुणे.
स्पष्टीकरण - २०१६ साली विटा [सांगली विभाग ]आगारामार्फत सांगली आगाराची हिरकणी बस MH १४ BT ४४३३ ही बस अमरनाथ यात्रेनिमित्त प्रासंगिक करारावर थेट जम्मू काश्मीर राज्यात जाऊन आलेली आहे.
४५. मध्यप्रदेश व गुजरात राज्यांना जोडणारा आपल्या एसटीचा मार्ग कोणता?
१. इंदौर - अहमदाबाद.
२. बुऱ्हाणपूर - सुरत.
३. भोपाळ - सुरत.
४. उज्जैन - अहमदाबाद.
स्पष्टीकरण - रावेर आगार जळगाव विभाग ह्यांचा बुऱ्हाणपूर ते सुरत असा नियमित मार्ग आहे. हा मार्ग बुऱ्हाणपूर [मध्यप्रदेश ] येथे सुरु होऊन सुरत [गुजरात] येथे संपतो.
४६. एसटी बसमध्ये आगाऊ आरक्षण करताना महिलांसाठी किती आसने राखीव असतात?
१. ३ आसने.
२. १० आसने.
३. ५ आसने.
४. ७ आसने.
स्पष्टीकरण -
एसटी बसमध्ये आगाऊ आरक्षण करताना महिलांसाठी
५ आसने
राखीव असतात.
४७. महाराष्ट्रातील असे कोणते ज्योतिर्लिंग आहे जेथे पोहोचण्यासाठी एसटीच्या एका विभागामध्ये खास महिंद्रा कंपनीच्या मिनी बसेस आहेत?
१. त्र्यंबकेश्वर.
२. घृष्णेश्वर.
३. भीमाशंकर.
४. परळी वैजनाथ.
स्पष्टीकरण -
भीमाशंकर हे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक प्रसिद्ध ठिकाण आहे.याठिकाणी एक घाट चढून जावे लागते. ह्यासाठी एसटीच्या पुणे विभागात
खास महिंद्रा कंपनीच्या मिनी बसेस आहेत.
४८. एसटीची मध्यवर्ती प्रशिक्षण संस्था कोठे आहे?
१. विद्याविहार, मुंबई.
२. रहाटघर, रत्नागिरी.
३. भोसरी, पुणे.
४. मोरभवन, नागपूर.
स्पष्टीकरण -
एसटीची मध्यवर्ती प्रशिक्षण संस्था
भोसरी, पुणे येथे आहे. याठिकाणी अधिकारी व कर्मचारी ह्यांचे विविध प्रकारचे प्रशिक्षण होते.
४९. नुकत्याच आरोग्य संकटाच्या पार्श्वभूमीवर कोटा - राजस्थान येथे अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी कोणत्या विभागाच्या बसेस गेल्या होत्या?
१. नाशिक
२. धुळे
३. जळगाव
४. पुणे
स्पष्टीकरण -
कोटा - राजस्थान येथे अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी
धुळे विभागाच्या बसेस गेल्या होत्या
५०. एसटीची मध्यवर्ती कार्यशाळा चिकलठाणा कोठे आहे?
१. पुणे.
२. औरंगाबाद.
३. नागपूर.
४. मुंबई.
स्पष्टीकरण - एसटीची मध्यवर्ती कार्यशाळा चिकलठाणा ही औरंगाबाद.येथे आहे.
Comments
Post a Comment