वाढदिवस लाडक्या एसटी सोबत!! पंकज कारंडे
वाढदिवस लाडक्या एसटी सोबत!!
एसटी म्हणजे आपल्या सगळ्यांच्या आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय एसटी ची बस सजवणे/एसटी बस ला मार्गफलक देणे असे कार्यक्रम आपण नेहमीच करत असतो आणि असाच एक कार्यक्रम आपल्या ग्रुपचे सदस्य योगेश वाघमारे यांनी करण्याचा ठरवला.
योगेश सरांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची गावची यष्टी आणि आवडत्या आगाराची एसटी बस म्हणजेच उस्मानाबाद आगाराची उस्मानाबाद - भिवंडी - उस्मानाबाद या मार्गावर धावणारी बस सजवायची त्यांनी आयोजिले. तसेच ही बस सजवण्यासाठी ते स्वतः त्यांच्या गावी गेले आणि उस्मानाबाद आगारामध्ये जाऊन आगार व्यवस्थापक यांची भेट घेतली त्यांना सर्व कार्यक्रमाबद्दल सांगुन रीतसर परवानगी घेतली.
दिनांक २४ जानेवारी २०१९ वार गुरूवार
आम्ही सगळे जण सकाळी १० वाजता कल्याण आगारामध्ये पोहोचलो आणि कल्याण आगाराच्या कल्याण - अहमदनगर या मार्गावर नव्याने सुरू झालेल्या शिवशाही बसला उत्कृष्ट असे मार्गफलक दिले
त्यानंतर थेट आम्ही आमचा मोर्चा वळवला तो भिवंडी आगाराकडे.
आम्ही सगळे दुपारी १२/१२:३० च्या दरम्यान भिवंडी आगारामध्ये पोहोचलो. भिवंडी आगारामध्ये बसेस कमी असल्याने उस्मानाबाद आगाराची बस हि तेथील कर्मचारी लोकल रूट साठी वापरतात. त्यादिवशी देखील त्यांनी उस्मानाबाद आगाराची बस लोकल रूट लावली होती आम्ही भिवंडी आगारामध्ये पोहोचल्यानंतर भिवंडी आगाराचे वाहन परीक्षक कारंडे सर ह्यांना भेटलो. कारंडे सरांना आम्ही काही दिवसांपूर्वी भेटुन आमच्या कार्यक्रमाची पूर्वकल्पना दिली असल्याने आम्ही भिवंडी आगारामध्ये पोहोचल्यानंतर थोड्याच वेळात त्यांनी आम्हाला बस उपलब्ध करून दिली.
आम्हाला दुपारी १ वाजता बस ताब्यात भेटली
त्यानंतर आम्ही बस धुवायला लावली तर बस वॉशिंग करणारे कर्मचारी हे जेवण करायला गेले होते त्यामुळे बस आम्हीच धुवून पुसून स्वच्छ केली. त्यानंतर आपल्या ग्रुपचे सदस्य क्षितिज आणि अनिकेत यांनी बसला रेडीयम च्या पट्या लावल्या. त्यानंतर बसला आतमधुन आणि बाहेरून कागदी फुले लावल्या त्यानंतर गाडीला शोभेल असा हार लावला. त्यानंतर आपल्या ग्रुपचे सदस्य क्षितिज कोतकर यांनी भिवंडी - उस्मानाबाद या बस साठी नवीन मार्गफलक लावला. बस सजवता सजवता अडीच तास कसे गेले आमचे आम्हालाच कळले नाही. घड्याळात बघतो तर ३:३० वाजले होते आणि गाडीचे चालक/वाहक देखील रेस्ट रूम मध्ये आराम करून परत गाडी जवळ आले होते सजवलेली गाडी बघुन गाडीच्या चालक आणि वाहक काकांना खुप आनंद झाला आणि सजवलेल्या गाडी चे फोटो काढण्याचा मोह वाहक काकांना आवरलाच नाही.
त्यानंतर आम्ही भिवंडी आगाराचे आगार व्यवस्थापक यांना बोलावून आपल्या ग्रुपबद्दल आणि आजच्या कार्यक्रमाबद्दल त्यांना माहिती दिली त्यानंतर त्यांनी देखील आमचे कौतुक केले त्यानंतर आम्ही गाडीच्या चालक आणि वाहक काकांचा शाल श्रीफळ आणि गुलाबाचे फुल देऊन सत्कार केला त्यानंतर आम्हाला गाडी उपलब्ध करुन देणारे वाहन परीक्षक कारंंडे साहेब यांचा सत्कार केला. त्यानंतर आम्ही गाडीसोबत फोटो काढले. भिवंडी आगारामधील कर्मचाऱ्यांचे गाडी सोबत फोटो काढले.गाडी मार्गस्थ होण्याचा वेळ जवळ आल्याने गाडी फलाटाला लावली आणि त्याच बस मधुन तिकीट काढून भिवंडी ते कल्याण असा प्रवास करून कल्याण बसस्थानक येथे बस आणि बसच्या चालक आणि वाहक काकांना निरोप देऊन आम्ही सगळे आपापल्या घरी गेलो.
विशेष आभार म्हणजे उस्मानाबाद आगाराचे आगार व्यवस्थापक साळुंखे सर , वाहतुक परीक्षक आलकुटे सर तसेच चालक विनोद मोरे सर आणि इस्माईल शहा सर आणि वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन करणारे वाहक लक्ष्मण काहुले सर
पंकज कारंडे
Comments
Post a Comment