एसटी ची आठवण येतेय? मग नक्की वाचा.

एसटी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग. संपूर्ण महाराष्ट्रातील करोडो प्रवाशांना घेऊन लाखभर कर्मचारी हजारो एस टी बसेस दररोज धावत असतात.

मात्र गेला एक महिना जवळपास हा संपूर्ण कारभार ठप्प आहे. आपल्यापैकी प्रत्येकाला एस टी ची आठवण येत असणार हे नक्की.

रोज सकाळी एस टी स्थानक गाठणे, तेथील बसेसची रहदारी, प्रवाशांची धावपळ, गर्दीत घुसून बस पकडणे, कधी सीटवर बसून राजासारखा प्रवास ते कधी उभ्यानेच जाणे, कंडक्टर काकांकडे तिकीट मागणे मग त्यांनी " सुटे पैसे द्या असं सांगणे" , एस टी च्या बेलचा आवाज, अशा कित्येक गोष्टी आपण सर्वजण सुमारे महिनाभर फक्त आठवणीतच अनुभवत आहोत.

दररोजच्या जनजीवनातील अविभाज्य घटक असलेली आपली लाडकी एस टी सुद्धा आपलीच आठवण काढत असणार.

मात्र सध्याच्या ह्या कठीण काळात एस टी ने तिच्या घरात आणि आपण आपल्या घरात थांबणे खूप गरजेचे आहे.

संपूर्ण महाराष्ट्राची जीवनवाहिनी एस टी आणि आपले नाते अधिक घट्ट करण्यासाठी सर्वांसाठी ही खास मेजवानी.

आपल्या लाडक्या एस टी वर भरभरून प्रेम करणाऱ्या एस टी प्रेमिंच्या ग्रुप मध्ये सामील होऊन आपण एस टी च्या प्रवासाचा आनंद घेऊ शकता.

येथे तुमच्यासाठी आहे.
संपूर्ण महाराष्ट्रभरातून एसटीचे असंख्य फोटो, भरपूर रंजक माहिती, प्रवास वर्णने, एसटीचे मॉडेल, पेंटिंग, विविध स्पर्धा, प्रश्नमंजुषा, एसटीचे व्हिडिओ, एस टी वर नितांत प्रेम करणारी माणसं आणि अजुन बरच काही.


https://docs.google.com/document/d/162VTIiKI_SE6UQfHMUBsSfV1JIuL1JeI3XnWRaBr1-o/edit?usp=sharing

Comments

Popular posts from this blog

एसटीला बोर्ड देणे - मार्गदर्शक सूचना

विदर्भाची बात काही औरच - श्रीकांत चांगण

माझा_बळी_का? (एसटी रडतेय...) - प्रथमेश गो. गुरव. (एसटी प्रेमी) सावंतवाडी.