पत्र मी एसटी बोलतेय -लेखक:रक्षित राऊत
पत्र
मी एसटी बोलतेय
मी एसटी बोलतेय
प्रश्न पडला असेल ना की एसटी काय बोलणार तिच काय प्रश्न आणि मनोगत किंवा अजून अश्या काय गोष्टी आहेत की ती बोलायला लागलीय
हो पण आज एसटी बोलतेय
ऐका तर
हो पण आज एसटी बोलतेय
ऐका तर
बोलण्यासारखं विषय नाही पण कधी कधी वाटत मला की मी मनोगत व्यक्त करावं.म्हणून तुम्हाला पत्र लिहला
कारण असे की
कारण असे की
कित्येक वर्षांपासून मी कोणतेही तक्रार नाही करता तुमची सेवा करतेय आज मला माझा अभिमान वाटतो की मी आज सुद्धा आहे जिवंत कारण काळाप्रमाणे मी लुप्त नाही झाली.त्याच कारण तुम्ही आहात.जिला लालडब्बा म्हणून प्रवासी समबोधायचे आज तेच लाला डब्बा नाव टोंपणनाव म्हणून आदराने मिरवतेय मी माझा लाल पिवळा रंग संग शहरांशी करून गेला मात्र गावाला चकचकाटाची स्वप्न तेवढी दाखवून गेला गावांशी शहर मात्र जोडली आणि प्रवास घडवला लाल पिवळ्या रंगाची मी एसटी आज लाल परिवर्तन झाली मग ती निळी झाली हिरवी झाली मग ती निम-आराम होऊन जांभळी-पांढरी आणि हिरवी-पांढरी अशी हिरकणी झाली आणि मग शिवाजी महाराजांची परंपरा जपण्यासाठी शिवनेरी झाली आणि काही दिवसातच सोबतीला माजी मोठी बहीण अश्वमेध आली आणि त्याना सोबतीला लहान बहीण आली शिवशाही जिने सर्वाना प्रेमात पाडल पण ना मला एक खंत आहे की खरंच आमचं हे अस्तित्व जस नवं कोरकरकरित आहे तसच राहील का ह्याची
जी लोक एसटीची सेवा घेताना त्यांची अवस्था बघून त्यात न बसता खासगी मधून प्रवास करतात आणि दंगलीच्या वेळी मला मारतात मला खूप दुःख होते पण मी माझा प्रवासी म्हणून खूप सहन करते पण जातीवाद आणि इतर गोष्टीचे दंगे तुम्ही करता मग मी निस्वार्थ पणे जातीवाद न करता माझं काम करते तरी का मला मारलं जात लहानपणी कधी तुम्ही एसटी तुन प्रवास केलाय ह्याची निदान जाणीव ठेवून तरी मला मारू नका खरंच खूप वाईट वाटत जेव्हा मी ज्या लोकांना सेवा देते तेच लोक मला मारतात माझं नुकसान करतात आणि मला खूप घाण करतात कचरा करतात सीटच्या मागच्या बाजूला प्रेमींची नाव आणि शिव्याच्या म्हणी लिहिलेल्या असतात तेव्हा मला असा वाटत की जणू हे माझे गुणधर्म आहे जे माझ्यात आहेत पण ते माझ्यात नाही आहेत माझ्या आतमधल्या सीट पाठी मागे कोरलेले टाईमपास साठीचे प्रवाश्यांच्या अंगातले गुण आहेत.खरच माझं एसटी हे अस्तित्व टिकवून राहील का तुमच्यामुळे माझं प्रशासन तोट्यात मला चालवताय अस ऐकलं वाईट वाटलं की माझ्यामुळे कर्ज झालंय इतकी वाईट अवस्था झालीय का की सरकारी एसटी चालवण्यासाठी सुद्धा कर्ज करावं लागतंय
निस्वार्थपणे काम करणारे माझे चालक आणि वाहक त्याना मारलं जात तेव्हा अतिशय वाईट वाटत कारण त्यांची काय चुकी असते आणि जरी चुकी झाली असेल तरी चुकीला शिक्षा झाली पाहिजे पण योग्य ती शिक्षा झाली पाहिजे माझे चालक वाहक हे मला खूप जपतात माझं सोंदर्य हे काय आहे ते फक्त माझ्या एसटी प्रेमींना माहीत असते खरंच काही ठिकाणी मी जेव्हा स्वतःला पाहते तेव्हा असं वाटतं की आज माझ्या कष्टाचा मोबदला मला भेटला तर काही घटना बघुन वाटत की मी केलेली सेवा व्यर्थ गेली
तरी सुद्धा मी तुमच्यासाठी सेवा पुरवते फक्त माझी इतकी विनंती आहे की माझी तोडफोड,घाण आणि विटंबना करू नका मला तुमच्याकडून इतकंच हवंय बाकी काही नकोय मग बघा कशी दिमाखात मिरवेण दरी-खोऱ्यातून राना-वनातून शहरांतून कशी मिरवते ती खासगी वाहनांना सुद्धा मागे काढेन कारण मला सुद्धा वाटते की तुम्हाला स्वच्छ सुंदर सेवा दयावी जबरदस्ती म्हणून नाही किंवा कर्तव्य म्हणून सुद्धा नाही तर एक एसटी प्रेमी म्हणून मला जपा
कळावे
मी (उर्फ लालडब्बा)
लेखक:रक्षित राऊत
उददेश-खरंच एसटी च सोंदर्य बिघडवू नये.जनसामान्यांची निस्वार्थपणे सेवा करणारी मानवनिर्मित निर्जीव परी आहे.जिचं सोंदर्य अप्रतिम आहे.लाखमोलाच्या एसटीचा आदर आणि अभिमान बाळगा गाव तेथे एसटी अस ब्रीद वाक्य मनात घेऊन तुमच्या घरापर्यंत पोहचलीय आणि तुम्हाला शहराची ओळख करून दिली म्हणून चला एक आज प्रण घेऊया एसटी बददल लोकांच्या मनात एक जागा निर्माण करूया एसटी त्यांना एसटीसाठीचे प्रेम भावना तयार करायला लावूया प्रत्येकाच्या मनात एसटी बद्द्लचा आदर देऊया
एम.एस.आर.सी.टी लव्हरस ग्रुप (MSRTC LOVERS GROUP) आम्ही एसटी प्रेमी
एम.एस.आर.सी.टी लव्हरस ग्रुप (MSRTC LOVERS GROUP) आम्ही एसटी प्रेमी
Comments
Post a Comment