एसटीची सर्व माहिती मिळवण्याची काही अधिकृत साधने.
एसटीची सर्व माहिती मिळवण्याची काही अधिकृत साधने.
- एसटीचे संकेतस्थळ MSRTC Website. हे संकेतस्थळ एसटीचे अधिकृत असून ह्यावर एसटीचे वेळापत्रक, सवलती, ४ व ७ दिवसांचे पासेस, योजना, माहितीच्या अधिकारांतर्गत प्रसारित केलेली माहिती, भरती, निविदा, सर्व संपर्क क्रमांक अशी भरपूर माहिती उपलब्ध आहे. तसेच येथे सूचना देण्याची व तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध आहे.
- एसटीच्या बसेसचे आगाऊ आरक्षण करण्यासाठीचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. ह्या साईटवरून आरक्षण करणे नेहमीच श्रेयस्कर आहे. येथे तुम्ही तुमचे अकाउंट तयार करून अनेक लांब व माध्यम पल्ल्यांच्या बसेसचे आगाऊ आरक्षण करू शकता. तसेच ह्याचा वापर करून वेळापत्रक सुद्धा तपासता येते.
- एसटीच्या बसेसचे आगाऊ आरक्षण करण्यासाठीचे हे अधिकृत मोबाईल अप्लिकेशन आहे. आपल्या स्मार्टफोनमध्ये हे install करू शकता. ह्या App चा वापर करून आरक्षण करणे तसेच वेळापत्रक पाहणे सहज शक्य आहे.
ह्या App चा वापर कसा करावा त्यासंबंधी माहिती. User Guide - https://msrtc.maharashtra.gov.in/documents/IOS%20Mobile%20App_User%20Manual.pdf
- जर तुम्ही मुंबई - पुणे परिसरात असाल तर तुमच्या स्मार्टफोनमध्ये M- Indicator हे रेल्वे वेळापत्रकाचे App नक्कीच असेल. ह्या App वर सुद्धा एसटीचे वेळापत्रक व संपर्क सूची उपलब्ध आहे. M- Indicator मध्ये MSRTC Data प्ले स्टोअर वरून डाउनलोड करण्यासाठी - https://play.google.com/store/apps/details?id=com.mobond.mindicator.msrtc
- एसटीचा टोल फ्री क्रमांक.
१८००२२१२५० ह्या क्रमांकावर आपण संपर्क साधून महत्वाची माहिती घेऊ शकता.
- माननीय परिवहन मंत्री ह्यांचे अधिकृत फेसबुक पेज. ह्यावर सुद्धा आपल्याला बरीच महत्वाची माहिती मिळू शकते.
एसटीच्या सकारात्मक प्रचारासाठी व प्रवाशांच्या सेवेसाठी MLG तर्फे जनहितार्थ प्रसारित.
Comments
Post a Comment