पुन्हा एकदा एसटीने तिचं माझ्यावरील प्रेम सिद्ध केलं.

आपण सर्व एसटी प्रेमी आहोत. आपण विविध माध्यमातून आपले एसटीवरचे प्रेम व्यक्त करत असतो. असं म्हणतात की निसर्गात पूर्णपणे न्याय आहे. आपण जर एखाद्यावर मनापासून प्रेम केलं की तेवढंच प्रेम आपल्याला मिळत असतं. अगदी त्याचप्रमाणे आपली लाडकी एसटी सुद्धा सर्व एसटी प्रेमींवर तेवढंच प्रेम करीत असते. एसटी सोबत असताना प्रत्येक क्षणातून ह्याची प्रचिती आपल्याला येत असते. मात्र काहीवेळा असे काही प्रसंग घडतात आणि एसटीच्या आपल्यावरील अलौकिक प्रेमाचा प्रत्यय येतो. असेच काही प्रसंग मी वाटाड्याची मागील अंकामध्ये सर्वांसमोर मांडले होते. मागील महिन्यात असाच एक अनुभव आला त्याबद्दल हा लेखप्रपंच.
बऱ्याच एसटी प्रेमींना "तुम्हाला एसटीवर प्रेम करून काय मिळत?" असे प्रश्न विचारले जातात. बऱ्याचदा आपण एसटीबद्दल एगदी बारीकसारीक माहिती गोळा करीत असतो. ग्रुपवर अशा माहितीची देवाणघेवाण करून सर्व माहिती आपण एकत्र करीत असतो. तेव्हा " एसटीची माहिती गोळा करून काय उपयोग?" असे प्रश्न सुद्धा काही एसटीची विशेष आवड नसलेले लोक विचारत असतात. एसटीवरील प्रेम आणि माहितीची देवाणघेवाण एखाद्या संकटातून आपल्याला कशी वाचवू शकते? ह्याच उत्तर आपल्याला ह्या लेखात मिळेल.
आणि पुन्हा एकदा एसटीने तिचं माझ्यावरील प्रेम सिद्ध केलं.
दिनांक २६ सप्टेंबर २०१९ गुरुवार.
मी माझ्या गावी पांडवदेवी पो. पोयनाड ता. अलिबाग येथे पनवेल वरून गेलो. जाताना अलिबाग आगाराच्या BT २१०५ ह्या बसने पनवेल ते पोयनाड असा १.१५ तासात छान प्रवास झाला. गणपतीच्या काळात मी गावाला जाताना सायकलवर गेलो होतो. मात्र परत येताना खूप पाऊस असल्यामुळे सायकल गावालाच ठेवली होती. २६ तारखेला मी खास गावावरून सायकल पुन्हा पनवेलला आणण्यासाठी गेलो होतो. गावची सर्व काम आटोपल्यावर ४ च्या सुमारास मी सायकलवर पनवेलला येण्यास निघालो. निघण्यापूर्वीच सायकलचं पंक्चर काढलं. १ किमी पुढे गेल्यावर पुन्हा पंक्चर झाली पुन्हा चालत मागे आलो परत पंक्चर काढलं. पुन्हा लगेच हवा गेली. मग मात्र नवीन ट्यूब टाकली आणि भर पावसात पोयनाड वरून पनवेलच्या दिशेने सायकलवर निघालो. अंधार पडायच्या आत पनवेल गाठायचे होते त्यामुळे कुठेही न थांबता वडखळ, रामवाडी, पेण असा एक एक टप्पा पार करत १.३० तासात जिता ह्या गावाजवळ पोहोचलो आणि पुन्हा एकदा जिता गावाच्या थोडं अलीकडे सायकलचा टायर पंक्चर झाला.
सुमारे ५.३० वाजले होते थोडासा पाऊस, ढगाळलेले वातावरण त्यामुळे थोडासा अंधार पडलाच होता. जिता गावात एखादे सायकलचे दुकान असेल अशी आशा होती मात्र ती व्यर्थ ठरली. तिथे हायवेला जवळपास बरेच पेट्रोल पम्पवर टायरची दुकाने होती जवळपास १० ठिकाणी विचारूनही सायकलचा पंक्चर काढायला कुणीच तयार होईना. त्यामुळे आता सायकलचा पंक्चर काढून ती चालवत पनवेलला जाणे खूपच कठीण वाटत होते. त्यामुळे आता एखाद्या गाडीत सायकल टाकून पनवेलला घेऊन जाणे हाच एक पर्याय समोर दिसत होता. एव्हाना मी चालत चालत जिता वरून खारपाडा गाव गाठले होते.
प्रवास करायचा तर एसटीनेच अस आपलं एक साधं तत्व आहे. त्यामुळे एसटीने सायकल घेऊन जाता येईल का ह्याचा विचार करत होतो. मात्र संध्याकाळची ६ ची वेळ पेण, अलिबाग वरून पनवेलला जाणाऱ्या गाड्या सर्व भरून जात होत्या अशा गर्दीत सायकल कशी न्यायची हा मोठा प्रश्न होता. त्यामुळे अगदी नाईलाजास्तव मी हायवे वरून एखाद्या टेम्पो अथवा ट्रकला हात दाखवून त्यात सायकल टाकून नेऊया असे ठरविले. अशाप्रकारे कोणत्याही खाजगी वाहनाला हात दाखवून कधीच प्रवास केलेला नसल्यामुळे अनेक नानाविध शंका मनात येत होत्या मात्र तरीही कोणताही पर्याय नसल्यामुळे मी हायवेवर टेम्पो, मोठी रिक्षा ह्यांना हात दाखवत होतो. सुमारे १ तास झाला पण एकही गाडी थांबली नाही.
अंधार पडला होता. खिशात फक्त १२० रुपये होते. सोबत सायकल, २ पाण्याच्या बाटल्या आणि सोबत घेतलेले ३ फाईव्ह स्टार चॉकलेट आणि मी हायवेवर उभा खारपाडा गावाजवळ. एक तास होऊन गेला तरीही सायकलसाहित पनवेल गाठण्यासाठी कोणतेच साधन मिळत नव्हते. थोडंसं टेन्शनच आलं होत. काहीशी भीती सुद्धा वाटू लागली होती. घरून सारखे आईचे फोन येत होते. एकंदरीतच सर्व निराशाजनक परिस्थिती झाली होती.
पुन्हा एकदा मी आपल्या एसटीवर विश्वास ठेऊन काही पर्याय आहे का ह्याचा विचार सुरु केला. तेव्हा एक कल्पना सुचली ती म्हणजे उरणकडून जो रस्ता खारपाडा येथे येतो तिथे जर गेलो तर पनवेल वरून साई, वशेणी ह्या त्या भागात जाणाऱ्या गाड्या संध्याकाळी जाताना पूर्ण भरून जातात मात्र परत पनवेलला येताना काहीशा रिकाम्या असतात तर त्या बसमध्ये सायकल नेता येईल असा विचार मनात आला. मी लगेच खारपाडा बिजवरून चालायला सुरुवात केली आणि जेथे साई, वशेणी कडून गाड्या येईल पनवेलला जातात त्या स्टॉपवर उभा राहिलो. त्याचवेळी मला पनवेल आगाराची बस BT ४४८० पनवेल वरून वशेणीला जाताना दिसली. हीच बस परतीच्या प्रवासात पनवेलला जायला मिळेल अशी आशा निर्माण झाली. मात्र तरीही मी रस्त्यावरील टेम्पो, मोठी रिक्षा ह्यांना हात दाखवत होतो. सुमारे १ तास झाला तरी एकही गाडी थांबली नाही. रात्रीचे ७.१५ झाले स्टॉप वरील वर्दळ कमी झाली अंधारात सायकल घेऊन मी एकटाच उभा होतो. सुमारे १.३० तास झाला तरी ती वशेणीला गेलेली बस आली नाही. ती बस वस्तीला तर राहिली नसेल अशी शंका माझ्या मनात येत होती. अक्षरशः हतबल झाल्यासारखे वाटत होते. पनवेलला कसे पोहोचायचे हा मोठा प्रश्न होता.
अशा संकटकाळी जे कुणी आधार देतात तेच आपले खरे मित्र. रात्री ७.३० वाजता हायवेवर अंधारात पंक्चर झालेली सायकल घेऊन मी उभा असताना दुरून मला आपली लाडकी एसटी म्हणजेच ती BT ४४८० ही बस येताना दिसली. संपूर्ण अंधार असताना बसच्या आवाजावरून मी नेमकं ओळखलं की ही एसटीचआहे. आणि साक्षात देवदूतासारखी ती एसटी आली. मी हात दाखवला. एसटी माझ्यासमोर थांबली. मी एका क्षणाचाही विलंब न करता बसच्या मागच्या दरवाजातून माझी सायकल बसमध्ये चढवली आणि मी बसमध्ये चढलो. ४.३० वाजता सायकल पंक्चर झाल्यावर तब्बल ३ तासांनंतर ७.३० वाजता माझा पनवेलच्या दिशेने प्रवास सुरु झाला आणि तो सुद्धा आपलूं एसटी मुळेच. गाडीत अवघे ४ प्रवासी होते. कंडक्टर काकांनी माझे तिकिटाचे २० रुपये आणि लगेच तिकिटाचे १० रुपये असे तिकीट फाडले. मी शेवटच्या सीटवर सायकल धरून बसलो होतो. रस्ता खराब असल्यामुळे पुढे येऊन बस असा काळजीपूर्वक सल्ला सुद्धा कंडक्टर काकांनी दिला. मात्र मी त्यांना इथेच बसतो मागे सायकल सोबत असे विनंतीपूर्वक सांगितले.
३ तासांच्या प्रतिक्षेनंतर सायकल घेऊन पनवेलच्या दिशेने प्रवास सुरु झाल्यामुळे माझ्या जीवात जीव आला. आणि हा प्रवास आपल्या एसटीने होत असल्यामुळे अजून जास्त चांगले वाटत होते. थोड्याच वेळात आम्ही कर्नाळा अभयारण्यात पोहोचलो. तिथे जंगलातील काळाकुट्ट अंधार, थंडगारवारा, सफाईदारपणे चढणारी आपली एसटी आणि शेवटच्या सीटवर सायकल धरून बसलेला मी. अतिशय दिलासादायक आणि समाधान देणारा प्रवास होता. मी पाणी प्यायलो सोबतचे चॉकलेट्स खाल्ले त्यामुळे थोडी तरतरी आली. अर्ध्यातासातच आम्ही पनवेलला पोहोचलो. नवीन पनवेल सिग्नलला उतरलो. चालक व वाहक काकांना धन्यवाद म्हणून मी सायकल सोबत चालत घरी पोहोचलो. अशा संकटसमयी मार्ग काढायला एसटीनेच हात दिला म्हणूनच पुन्हा एकदा खात्री पटली कि "एसटीसुद्धा आपल्यावर प्रेम करते"
एसटी आणि आपले असलेले प्रेमाचे नाते, एसटीवरील विश्वास आणि एसटीबद्दलची असलेली बारीकसारीक माहिती ह्यामुळेच ह्या संकटावर मी मात करू शकलो.
-- स्वप्निल पाटील

Comments
Post a Comment