श्री महालक्ष्मी एक्सप्रेस

माझ्या वाढदिवसाचे निमित्त साधून सजवण्यात आलेली
�।। श्री महालक्ष्मी एक्सप्रेस ।।�
�माझी कोल्हापूर ची मैना..!�
खूप दिवसापासून कोल्हापूर - परेल गाडी सजवायची इच्छा होती पण काही कारणाने ती नेहमी राहत होती अखेर तो क्षण आला म्हणजे 10 मार्च ठरल्या प्रमाणे मी, रक्षित, सिध्दांत, अजहर आणि पंकज परेल मध्ये भेटलो तसा गाडी येण्यास वेळ होता म्हणून आम्ही गाडी सजवण्याचे समान म्हणजे रंग ,ब्रश हार इत्यादी वस्तूंची खरेदी केली,8.30 च्या वेळेस आमची गाडी चे दिमाखात परेल डेपोत आगमन झाले मग आम्ही सर्व जाऊन गाडी जवळ पोहचलो ,ड्रायव्हर काका ना सांगून गाडी धुण्यासाठी रॅम्प वर लावली ,गाडी सजवणार हे ऐकताच गाडीचे कंडक्टर सागर सावंत यांनी स्वतः गाडी धुवायला घेतली एवढा लांबचा प्रवास करून ही ते खूप आनंदाने गाडी धुवात होते तसे त्यांना मदत म्हणून अजहर भाऊ ने गाडी धुण्यात हाथ भार लावला ,नंतर ठरल्या प्रमाणे गाडी एक ठिकाणी लावून रंग काम करण्याची तयारी सुरू केली रक्षित ने आधीच नक्षी काम त्याच्या नजरेत कैद करून ठेवले होते त्याला साथ दिली ते अजहर, सिद्धांत आणि पंकज आणि सोबत गाडीचे चालक म्हणजेच आमचे मित्रा महेश माने , सर्व रंग काम करून,बोर्ड जवळ मोत्याचा गोंड लावून आणि समोर लाल रंगाचा फुलांची माळ लावून झाल्यावर गाडी वेळे नुसार ठीक 11 वाजता आपल्या प्लॅटफॉर्म वर लागली लोक खूप आतुरतेने गाडी कडे पाहत होते मग गाडी ला समोर हार लावून अजहर भाऊ ने गाडी ची पूजा केली. आणि काही फोटो काढले चालक तथा वाहक काका सोबत गाडी सजवण्यात आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होता ! रात्र असल्या मुळे काही फोटोस व्यवस्थित आले नाहीत तेव्हा आमचा मित्रा विश्वजीत यादव याला msg करून सांगितले की गाडीचे फोटोस काढ त्याने कराड स्थानकात फोटो काढले आणि पाठवले .
गाडी सजवण्यात रक्षित ,अजहर काझी, पंकज, सिद्धांत यांचे खूप मोलाचा वाटा आहे. �

( यातील काही फोटो रक्षित, विश्वजीत,पंकज, सिद्धांत आणि अजहर यांनी काढले आहेत)� महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ �
      �� ।। श्री महालक्ष्मी एक्सप्रेस ।। ��

    �  परेल -कोल्हापूर�

मुंबई (परेल) � सातारा � कराड � कोल्हापूर

मुंबई (परेल) वरुन सुटण्याची वेळ :- २३:०० वाजता

�भाडेदर �

�₹ प्रौढ ६६८ रु  बालक ३३४ रु �

�प्रवासाचे अंतर ४०० किमी �


-- Sandip Pawar

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

एसटीला बोर्ड देणे - मार्गदर्शक सूचना

विदर्भाची बात काही औरच - श्रीकांत चांगण

माझा_बळी_का? (एसटी रडतेय...) - प्रथमेश गो. गुरव. (एसटी प्रेमी) सावंतवाडी.