आंतरराज्य प्रवास वर्णन भाग एक -पंकज कारंडे

नमस्कार मंडळी...!
            मी माझ्या पहिल्या आंतरराज्य दौऱ्याचे प्रवास वर्णन आपल्या समोर सादर करत आहे मला आशा आहे की तुम्हाला माझे प्रवास वर्णन नक्की आवडेल.

           एसटीने राज्यभर फिरणे हे तर आपण सर्व एसटी प्रेमी नेहमी करत असतो. आपली एसटी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सेवा देत असते. तसेच आपली एसटी महाराष्ट्र बाहेर सुद्धा सेवा देते. म्हणूनच मी हैदराबाद आणि पणजी येथे एसटीने जावू असा प्लॅन केला. आपली एसटी जशी महाराष्ट्र मध्ये सर्वांची आवडती आहे. तशीच दुसऱ्या राज्यात सुद्धा लोक तिची आतुरतेने वाट बघत असतात.
          माझ्या कॉलेज च्या द्वितीय वर्षाची परीक्षा ११ मार्च ला संपली आणि दुसऱ्या दिवशी मी माझ्या आंतरराज्य दौऱ्यासाठी निघालो
मी १२ मार्च ला सकाळी १० वाजता घरातून निघालो आणि ठाणे स्टेशन गाठले. ठाणे स्टेशन ला आल्यानंतर मी ४ दिवसाचा आंतरराज्य पास काढला आणि माझी काही काम आटोपून पुण्याकडे रवाना झालो. माझ्या प्लॅन ची सुरुवात पुण्यातून करणार असल्याने मी संध्याकाळ पर्यंत पुण्यात पोहोचलो. माझ्या प्लॅन बद्दल मी आपल्या ग्रुपचे सदस्य विठ्ठल टाळकुटे आणि शुभंकर सिद्धांती ह्यांना सांगितले होते. ठरल्याप्रमाणे आम्ही तिघे स्वारगेट बस स्थानकात भेटलो थोडा वेळ गप्पा झाल्यानंतर मला वाकडेवाडी स्टँड ला जायचं असल्याने आणि विठ्ठल व शुभंकर ला घरी जायचं असल्याने आम्ही तिकडून निघालो. स्वारगेट ते वाकडेवाडी स्टँड कसे जायचे ह्याचे मार्गदर्शन शुभंकर ने केल्याने मी थोड्या वेळात म्हणजेच साधारण रात्री ९:३० वाजताच्या दरम्यान मी वाकडेवाडी स्टँड ला पोहोचलो
           माझा पास हा रात्री १२ वाजता चालू होणार असल्याने मी लवकर वाकडेवाडी बस स्थानकात पोहोचलो होतो बस स्थानकात उभ्या असलेल्या वेगवेगळ्या गाड्या मी पाहू लागलो बस स्थानकाचा आवारात उभ्या असलेल्या बसेस चे फोटो काढले

दिवस पहिला
             घड्याळात १२ वाजले आणि माझा पास चालू झाला. मला औरंगाबाद ला जायचे असल्याने आता मी माझ्या प्लॅन च्या पहिल्या गाडीची म्हणजेच वाकडेवाडी वरून रात्री ००:३० ला सुटणाऱ्या पुणे -- परतूर या गाडीची वाट पाहू लागलो. बरोबर ००:३० ला परतूर आगाराची BL २८६७ प्लॅटफॉर्म ला लागली औरंगाबाद/जालना येथे जान्यासाठी शेवटची गाडी असल्याने गाडी मध्ये चांगलीच गर्दी होती मी देखील माझ्या आरक्षित आसनावर जाऊन बसलो गाडी रात्री १२:४५ ला वाकडेवाडी बस स्थानकातून निघाली आणि माझा औरंगाबाद च्या दिशेने प्रवास सुरू झाला मी देखील दिवसभर प्रवास करून दमलो असल्याने मला झोप कधी लागली कळलं नाही.
            मी पहाटे ५:३० ला औरंगाबाद सिडको बस स्थानक येथे पोहोचलो. औरंगाबाद सिडको बस स्थानकातून विदर्भ मध्ये जाण्यास गाड्या मिळतात तसेच खूप वेगवेगळे मार्ग बघायला मिळतात. माझ्या ओळखीचे बरेच चालक वाहक औरंगाबाद येथे बदली झाले होते मी औरंगाबाद सिडको येथे पोहोचल्यानंतर माझ्या ओळखीच्या सर्व चालक वाहक यांची भेट घ्यायची ठरवले होते त्या प्रमाणे मला सगळे चालक वाहक औरंगाबाद सिडको येथे भेटले. भेट झाल्यानंतर मला पुढे देऊळगाव राजा ला जायचे होते त्यामुळे मी प्लॅटफॉर्म ला लागलेल्या सर्व गाड्या पाहू लागलो.
            प्लॅटफॉर्म ला चांदुर रेल्वे आगाराची AQ ६४६१ औरंगाबाद -- चांदुर रेल्वे गाडी लागली होती गाडी बर्यापैकी रिकामी असल्याने मी पटकन जाऊन वाहक काकांच्या बाजूच्या सीटवर बसलो थोड्याच वेळात म्हणजे ७:४५ ला औरंगाबाद सिडको बस स्थानकातून आमचा देऊळगाव राजा च्या दिशेने प्रवास सुरू झाला विदर्भातील टाटा म्हणजे एकच नंबर पळणाऱ्या गाड्या हे आधीपासून माहीत होत थोड्याच वेळात हायवे ला लागल्यानंतर गाडीने चांगलाच वेग धरला चालक काका देखील उत्तम रित्या गाडी हाकत होते दरमजल करत करत आम्ही जालना ला पोचलो आणि प्रवासी चढ उतार करून आम्ही परत देऊळगाव राजा च्या दिशेने प्रवास करू लागलो जालना पासून देऊळगाव राजा पर्यंत रस्ता थोडा खराब असल्याने चालक काका हळू हळू गाडी चालवत होते आम्ही ९:३० ला देऊळगाव राजा बस स्थानक मध्ये पोचलो देऊळगाव राजा येथे पोहोचल्यानंतर आपल्या ग्रुपचे सदस्य वैभव भुसारी यांची भेट घेतली.
            वैभव भुसारी यांची भेट घेतल्यानंतर तिकडून मला लातूर येथे रात्री पर्यंत पोचायचे होते पण थेट गाडी नसल्यामुळे मग मी शेगाव -- तुळजापूर ह्या गाडीने बीड पर्यंत जाण्याचा सल्ला वैभव याने दिला थोड्याच वेळात तुळजापूर आगाराच्या BL३५२८ शेगाव तुळजापूर या गाडीने प्रवेश केला वैभव चा निरोप घेऊन मी बीड च्या दिशेने प्रवास सुरू केला. दुपारी २/२:३० च्या दरम्यान बीड स्थानकात पोहोचल्यावर बाजूलाच लातूर आगाराची BL ३८२० औरंगाबाद -- लातूर हि हिरकणी लागली होती ती पकडुन लातूर च्या दिशेने प्रवास सुरू झाला संध्याकाळी ६/६:३० ला लातूर बस स्थानकात पोहोचलो. लातूर बस स्थानकात पोहोचल्यानंतर तिथे उभ्या असलेल्या विविध बसेस पहिल्या थोडे फार फोटो काढले
           थोडा वेळ टाइमपास केल्यानंतर घड्याळात रात्री चे ८ वाजले होते. आता मी माझ्या आवडत्या आगाराच्या गाडीची वाट पाहू लागलो थोड्याच वेळात वसई आगाराच्या MG बांधणी च्या नव्या कोऱ्या ८५९५ गाडीने लातूर बस स्थानकात प्रवेश केला. मी लगेच गाडी जवळ जाऊन बघितले आणि ओळखीचे चालक वाहक भेटले. मला ठाण्यापासून एवढ्या लांब लातूर मध्ये पाहून ते आश्चर्यचकित झाले त्यांना माझ्या प्लॅन बद्दल सांगितले त्यांना देखील खूप आनंद झाला थोडा वेळ गप्पा मारून झाल्या नंतर माझ्या गाडीची वेळ जवळ आली होती थोड्याच वेळात लातूर हैद्राबाद ह्या MG बांधणी च्या नव्या कोऱ्या ७४१५  गाडीने लातूर बस स्थानकात प्रवेश केला मी देखील माझ्या ओळखीच्या वसई आगाराच्या चालक वाहक यांचा निरोप घेतला आणि माझ्या आरक्षित आसनावर जाऊन बसलो. थोड्याच वेळात गाडी हैद्राबाद च्या दिशेने मार्गस्थ झाली...

भाग दोन लवकरच.

Comments

Popular posts from this blog

एसटीला बोर्ड देणे - मार्गदर्शक सूचना

विदर्भाची बात काही औरच - श्रीकांत चांगण

माझा_बळी_का? (एसटी रडतेय...) - प्रथमेश गो. गुरव. (एसटी प्रेमी) सावंतवाडी.