एसटी प्रेमी - नाव एक रूपं अनेक 

एसटी प्रेमी - नाव एक रूपं अनेक

मंडळी आपल्यापैकी बरेच जण देवाला मानतात. प्रत्येक धर्म, संस्कृती, प्रदेशानुसार देव ही संकल्पना बदलत असते. मात्र अंतिमतः सर्व सृष्टीचा कर्ता करविता एकच आहे. हे सर्वत्र मान्य आहे. म्हणजेच प्रत्येकाच्या मनात देवाची रूपं अनेक आहेत मात्र देव हा एकच आहे. तसेच एसटी बसेसची नावे अनेक असली तरी एसटी हे एकच नाव त्या सर्वांची ओळख सांगायला पुरेसे आहे. अगदी त्याचप्रमाणे एसटी प्रेमी हे नाव एक असले तरी त्यांची रूपं अनेक आहेत.

एसटी संबंधी विविध प्रकारच्या आवडी निवडी प्रत्येकाला असल्या तरी एसटी हा सर्वांना बांधून ठेवणारा समान धागा आहे. एसटीची विशेष आवड सर्वच एसटी प्रेमींना असते. एसटीचा आवाका एवढा मोठा आहे की एसटी संबंधी अनेक बाबींची आवड निर्माण होऊ शकते. एसटी बद्दल विविध प्रकारची आवड असलेल्या सर्वांना एका छताखाली आणणारी संज्ञा म्हणजे एसटी प्रेमी होय.

एसटी प्रेमींची विविध रूपे
प्रवासी
बरेच एसटी प्रेमी एसटीने प्रवास करणे पसंद करतात. एसटीचा प्रवास हा सामान्यतः एसटी प्रेमाचं अपाय ठरतो. ह्यात सुद्धा एसटी प्रवासाचे विविध प्रकार आहेत. मोठ्या सुटीत गावी जाताना प्रवास करणारे, कामानिमित्त प्रवास करणारे, शाळा - कॉलेजसाठी नियमित प्रवास करणारे, ४ अथवा ७ दिवसांचा पास काढून प्रवास दौरे करणारे, इत्यादी. तसेच प्रवास करताना केबिन सीट मिळालीच पाहिजे असा आग्रह असणारे सुद्धा एसटी प्रेमी आहेत.

एसटीचे मॉडेल्स
आपल्या लाडक्या एसटीचे विविध आकारातील मॉडेल्स बनविणारे एसटी प्रेमी सुद्धा आपल्या ग्रुप मध्ये आहेत. अगदो हाताच्या बोटावर मावणारे एसटीचे मॉडेल्सपासून मोठे मॉडेल्स बनविणारे सुद्धा एसटी प्रेमी आहेत.

एसटीची चित्रे
काही एसटी प्रेमी एसटीची अगदी हुबेहूब चित्रे काढतात. चित्रे काढताना एसटीचे अगदी नेमके बारकावे सुद्धा त्यात टिपले जातात. अशी एसटीची चित्रे पाहणे हा एक सुखद अनुभव असतो.

इतिहास
एसटी प्रेमींपैकी काही जुनी व ज्येष्ठ मंमंडळींनी एसटीच्या इतिहासाचा एक अमूल्य ठेवा आपल्याकडे जपून ठेवलेला आहे. जुन्या बसेस, मार्ग, प्रवासाचे अनुभव, असा अनमोल ठेवा अशा एसटी प्रेमींकडे असतो.

 तिकिटे
एसटीची तिकिटे जमा करण्याचा छंद बऱ्याच एसटीप्रेमींना आहे. जुनी तिकिटे, पासेस, आरक्षणे असा बराच संग्रह अशा एसटी प्रेमींकडे असतो.

नंबर्स
बरेच एसटी प्रेमी एसटीच्या बस नंबर्सच्या नोंदी स्वतःकडे ठेवतात. कोणती बस कोणत्या डेपोला दिली, कधी कुठे ट्रान्सफर झाली ह्याची सर्व माहिती त्यांच्याकडे असते.

फोटो
- घाट - स्टॅन्डएसटीचे फोटो काढणे हे सुद्धा एसटी प्रेमींचे एक प्राथमिक काम आहे. प्रत्येक एसटी प्रेमी आपल्या परीने एसटीचे जास्तीत जास्त चांगले फोटो काढण्याचा प्रयत्न करीत असतात. कुणी बससथनकावर फोटो काढतात तर काहीजण खास हायवे व घाटात जाऊन एसटीचे फोटो काढतात. 

कर्मचारी
सर्वच एसटी प्रेमी एसटी कर्मचाऱ्यांचा आदर करतात. एसटी कर्मचाऱ्यांचा यथोचित सन्मान करणे. त्यांच्यासोबत चांगले मैत्रीचे संबंध प्रस्थापित करणे ह्यात एसटी प्रेमी अग्रेसर असतात.

सजावट व बोर्ड
 बरेच एसटी प्रेमी एसटी बसची सजावट करून तसेच एसटीला नवीन मार्गफलक देऊन आपले एसटीवरील प्रेम व्यक्त करीत असतात.

अशाप्रकारे एसटी प्रेमींची अनेकविध रूपं आहेत. वरील रूपं ही केवळ प्रातिनिधिक स्वरूपाची आहेत.
मित्रांनो आपल्यापैकी प्रत्येकाचे वय, शिक्षण, व्यवसाय, पत्ता वेगळा असल्याने प्रत्येकाची एसटी बद्दलची आवड निवड वेगळी आहे.

आपण सर्वांनी MLG च्या अंतर्गत एकत्र राहणे हे आपल्या सर्वांसाठीच हिताचे आहे. प्रत्येकाच्या एसटी प्रेमाचा आदर करणे ही यासाठी अगदी प्राथमिक गरज आहे. एसटी प्रेमींच्या उज्ज्वल भविष्यासाठी व पर्यायाने एसटीच्या प्रगतीसाठी आपण एकत्र राहूनच MSRTC LOVERS GROUP च्या माध्यमातून भरीव काम करू शकतो. Coming together is Beginning, Keeping together is progress and Working together is Success.
--- स्वप्निल पाटील - पनवेल ९८६९५६५९६१

Comments

Popular posts from this blog

एसटीला बोर्ड देणे - मार्गदर्शक सूचना

विदर्भाची बात काही औरच - श्रीकांत चांगण

माझा_बळी_का? (एसटी रडतेय...) - प्रथमेश गो. गुरव. (एसटी प्रेमी) सावंतवाडी.