एसटी प्रवाशांचा संवाद - देवेंद्र वेलणकर..... विजयदुर्ग..
आज सकाळी आमच्या विजयदुर्ग डेपोच्या ०६.४५ च्या विजयदुर्ग - सावंतवाडी गाडीने सावंतवाडी पर्यंत प्रवास करत असताना घडलेला प्रसंग....
बस क्रमांक :- महाराष्ट्र - २० बी. एल. २७०३ ( उस्मानाबाद विभाग - परांडा आगार - गौरी गणपती जादा आलेली व तात्पुरत्या स्वरुपात विजयदुर्ग डेपोने वापरलेली गाडी )
आसन क्रमांक - २५ ( खिडकी )
सकाळची वेळ मी मस्तपैकी खिडकी open ठेऊन निसर्गाचा, धुक्याचा आस्वाद घेत प्रवास करत होतो....
गाडी कणकवली रेल्वे स्टेशनला जात असल्याने आणि त्यात गणपती हंगाम चालु असल्याने गौरी गणपती विसर्जन करुन परतीच्या प्रवासासाठी निघालेल्या चाकरमान्यांच्या गर्दीने खच्चाखच भरून डबल लाईन स्टँडिंग होती. माझ्या सीटच्या बाजुला दोघं मध्यमवयीन प्रवासी उभे होते. त्यांचं आपापसात बोलणं चालु होतं अन् बऱ्यापैकी मोठ्या आवाजात बोलत असल्याने ते बोलणं माझ्या कानावर पडत होतं. त्यातील एकजण रेल्वेने मुंबईला जाणारा तर एकजण काही कामानिमित्त कणकवलीला जाऊन संध्याकाळी एस. टी. ने मुंबईला जाणार होता. त्यांच्या बोलण्यावरून ते दोघंही गावातलेच पण नोकरी निमित्त मुंबईस्थित चाकरमानी होते हे मला समजुन चुकलं होतं.

पहिला प्रवासी :- काय ओ, खय चल्लास? मुंबैक की काय?
दुसरा प्रवासी :- होय ओ, साडेनवची दिवा असा.
पहिला प्रवासी :- जागा मिळतली मा बसाक?
दुसरा प्रवासी :- आता बघु कसा काय होता ता.... कायव करून गाडीयेत घुसाक हव्या.
पहिला प्रवासी :- आे गाडीयेत घुसतलास ता बरोबर पण बसाचा काय? बसुक जागा नाय गावली तर मुंबैपर्यंत काय उभ्यानच जातलास?
दुसरा प्रवासी :- मग काय.... नाईलाज असा... उभ्यान तर उभ्यान, जाऊचा लागतलाच....
पहिला प्रवासी :- धन्य आसास बाकी तुमी....
दुसरा प्रवासी :- तुमी खय चल्लास?
पहिला प्रवासी :- मी कणकवलेक जातय. याक काम आसा ता करुन मग संध्याकाळच्या एष्टेन मुंबैक जातलय....
दुसरा प्रवासी :- एष्टेन???????
पहिला प्रवासी :- हा मग? त्यात काय झाला?
दुसरा प्रवासी :- छ्या.... एष्टेन? नाय ओ.... कसा हा, एष्टेन गेला की आपटत जावचा लागता म्हनान इचारलय....
पहिला प्रवासी :- मी बाबा एष्टेनच येतय आणि एष्टेनच जातय. कसा हा बघा, चार पैशे जास्त गेले तरी चलतत पण कसली धाकधुक नाय. येवचा आणि जावचा बुकिंग एकदमच करुन ठेयतय. मग कसा एकदा सीट बुक झाली की मी राजासारखो आरामात बसान जावक मोकळो. हल्ली एस. टी. वाले जादा गाडीये सोडतत त्यामुळे गाडी येळेवर येता, लेट होऊचा झंजट नाय. कोण माका सीटवरुन उठवुन घालीत, कोण अॅडजेस्ट करुक सांगीत, माका गाडीयेत कोण घेवचो नाय, गाडीयेचो दरवाजो उघडुचो नाय यासारखी डोकेदुखी अजिबात माझ्या मागे लागत नाय. काय ता ग्रुपबुकिंगपन करतत असा हल्ली एेकलय. एष्टेचे गाडीयेपन भारी भारी असतत. हायवेक नुसते सुंइ सुंइ करीत, खासकरुन लक्झरेक पाठी टाकीत हायवेवर नुसतो धुरलो करीत असतत. सुखासुखी आपलो संध्याकाळी बसतय आणि फाटे उजाडताना मुंबैक उतारतय.
दुसरा प्रवासी :- ( तो निरुत्तर झाला, काय बोलावं हेच त्याला सुचलं नाही आणि त्यांचं मग दुसऱ्या विषयावर बोलणं सुरु झालं.... )
कितीही तक्रारीचे सुर असले तरी त्यावर मात करत कोणत्याही प्रवासासाठी 'सर्वसामान्य' लोकांची first priority असलेल्या लालपरीचं अर्थात माझ्या एस. टी. चं गुणगाण ऐकुन, तिच्यावर लोकांचा असलेला विश्वास पाहून मनातलं हसु चेहऱ्यावर आणत आणि एस. टी प्रति असलेल्या अभिमानात भर पाडत पुढील प्रवासाचा मनसोक्त आनंद घेतला.....
Comments
Post a Comment