MSRTC LOVERS GROUP चे विविध उपक्रम

MSRTC LOVERS GROUP चे विविध उपक्रम 

एसटी बसला बोर्ड देणे 
संपूर्ण महाराष्ट्रात MLGचे अनेक सदस्य स्वखर्चाने व स्वखुशीने आपल्या जवळील आगारास एसटीला लावण्यासाठी बोर्ड देत असतात. आता पर्यंत असे शेकडो बोर्ड ग्रुपच्या माध्यमातून देण्यात आले आहेत.

एसटीची रंगतदार सजावट करणे
MLG च्या माध्यमातून काही सदस्य एसटी बसची आकर्षक सजावट करतात. अगदी रात्रभर आगारामध्ये काम करून बसच्या ग्रीलला रंग देणे, किरण लाईट्स लावणे इत्यादी कामे एसटी प्रेमी आनंदाने करतात. 

एसटीचा वाढदिवस साजरा करणे 
१ जून ह्या एसटीच्या वाढदिवशी अनेक सदस्य बसस्थानकावर केक कापून, कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देऊन, बसला हार घालून एसटीबद्दल आपले प्रेम व्यक्त करतात.

नवीन बसमार्ग सुरु होण्यासाठी पाठपुरावा 
MLG चे बरेच सदस्य विविध आगारांमध्ये प्रवासी मागणीनुसार नवीन एसटीचे मार्ग सुरु करण्यासाठी पत्रव्ययहार व पाठपुरावा करीत असतात. बरेच सदस्य अशा प्रकारे लांब पल्ल्याचे तसेच आंतरराज्य नवीन मार्ग सुरु करण्यात यशस्वी झाले आहेत.

प्रवासी सहायता कक्ष
 गणपती काळात विशेष वाहतूक व्यवस्थेदरम्यान काही गर्दीच्या ठिकाणी ग्रुपतर्फे प्रवासी सहायता कक्षाची स्थापना केली जाते. ह्याद्वारे प्रवाशांना मार्गदर्शन, ज्यादा बस गाड्यांचे व्यवस्थापन, इत्यादी कामे दरवर्षी केली जातात.

अभ्यास दौरा 
मध्यवर्ती कार्यशाळा, प्रशिक्षण संस्था, भोसरी, विभागीय कार्यशाळा, आगार, रा. प. मुद्रणालय, विद्याविहार अशा विविध ठिकाणी अभ्यास दौरे आयोजित करून एसटीच्या एकूण कामकाजाबद्दल माहिती घेतली जाते.

एसटीचे फोटो 
एसटीचे मनोवेधक असे फोटो काढून विविध मार्ग, आणि त्यांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवणे तसेच दिमाखदार फोटो काढून एसटीची जनमानसातील प्रतिमा सुधारण्यास हातभार लावणे.

एसटीविश्व
 एसटी प्रेमींच्या छंदातून जमा झालेल्या सर्व वस्तू म्हणजेच फोटो, मॉडेल्स, तिकिटे, पासेस, जुन्या आठवणी, पोस्टर्स इत्यादींचा भरगच्च खजिना असलेले एसटीविश्व प्रदर्शन भरविणे.

वाटाड्या 
सलग ६ वर्षांपासून MLG चे मुखपत्र असलेला "वाटाड्या"चा अंक प्रसिद्ध करण्यात येतो. दरवर्षी सदर अंक एका विशिष्ट विषयाला वाहिलेला असतो. प्रवासवर्णने, एसटीवरील कविता, शब्दकोडे, एसटीबद्दलचे लेख असा सर्व वाचनीय मजकूर ह्या अंकात असतो.

शैक्षणिक क्षेत्रात 
काही सदस्य एसटीची आवड आपल्या शैक्षणिक क्षेत्रात त्यावर काम, संशोधन, प्रोजेक्ट करून जोपासतात. अनेक तांत्रिक बाबींवर ग्रुपच्या सदस्यांनी प्रोजेक्ट करून त्यांचे सादरीकरण केलेले आहे.

एसटीचे मॉडेल्स /चित्रे 
MLG चे बरेच सदस्य विविध प्रकारची एसटीची मॉडेल्स बनवितात. अगदी हाताच्या बोटाएवढ्या मॉडेल पासून काही फुटांचे मोठे मॉडेल्स बनविणारे कलाकार ग्रुपमध्ये आहेत. तसेच काही सदस्य हाताने एसटीची हुबेहूब चित्रे काढतात. 

नेमक्या सूचना देणे 
एसटीला अभ्यासपूर्ण, नेमक्या सूचना देणे, वेळप्रसंगी लेखी तक्रारी करणे, माहितीच्या अधिकाराचा वापर करणे अशा बाबी एसटीच्या सकारात्मक वाटचालीसाठी ग्रुपच्या माध्यमातून केल्या जातात.

बस नंबर्सचा Database
संपूर्ण महाराष्ट्रातील एसटी बसच्या नंबर्स नुसार त्यांचा प्रकार, रंग, आगार, एका आगारातून दुसऱ्या आगारात होणारे ट्रान्सफर, विशिष्ट मार्गावर ती गाडी फिक्स असणे अशा प्रकारची माहिती संकलित केली जाते.

Green Tourism 
फक्त एसटीचाच प्रवास करून विविध पर्यटन स्थळांवर सहलींचे आयोजन करण्यात येते. पर्यावरण पूरक पर्यटनाला /सहलींना प्रोत्साहन देणे हा या मागचा उद्देश आहे.

Comments

Popular posts from this blog

एसटीला बोर्ड देणे - मार्गदर्शक सूचना

विदर्भाची बात काही औरच - श्रीकांत चांगण

माझा_बळी_का? (एसटी रडतेय...) - प्रथमेश गो. गुरव. (एसटी प्रेमी) सावंतवाडी.